Google Ad
Editor Choice

मराठवाडा जनविकास संघ व जय भगवान महासंघातर्फे अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ऑगस्ट) : पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व पिंपरी येथील जय भगवान महासंघातर्फे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षमित्र अरुण पवार यांच्या हस्ते आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गणेश ढाकणे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या दोन महान व्यक्तींनी सामाजिक कार्याद्वारे समाजाला नवीन दिशा देण्याचे काम केले. या महान पुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन सर्वजण एकत्रितपणे पूरग्रस्तांसाठी जीवनावशक वस्तूची मदत करण्याचा निश्चय करण्यात आला.

Google Ad

लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले, की अण्णाभाऊ साठे यांचे कार्य बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे; तर लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली.

अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर गणेश ढाकणे म्हणाले, की लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा दिला. टिळक यांच्या कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

प्रकाश घोळवे यांनी सांगितले, की अण्णाभाऊ साठे यांचे कार्य बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे तर लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली.

गणेश वाळुंजकर यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले. खंडू खेडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कैलास सानप यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

यावेळी जय भगवान महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष
अमोल नागरगोजे, जय भगवान महासंघ मावळ तालुका अध्यक्ष डॉ. एकनाथराव गोपाळघरे, पिंपरी चिंचवड शहर युवा नेते जितेंद्र बांगर, जय भगवान महासंघ पुणे जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय कीर्तने, जय भगवान महासंघ पिंपरी-चिंचवड शहर शिक्षक संघटना उपाध्यक्ष श्री. पाखरे सर, जय भगवान महासंघ पिंपरी चिंचवड शहर युवा नेते गोरख सानप, जय भगवान महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत आर घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!