Google Ad
Uncategorized

मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा रमेश देव यांचे निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ ऑगस्ट) : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा रमेश देव यांचे गुरुवार दि. २४ ॲागस्ट रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन-अडीच वर्षांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. तसेच, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती असे सीमा देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी माहिती दिली.

सीमा देव यांनी ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

Google Ad

सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची अपत्यं आहेत. १९५७ सालच्या ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी भूमिका साकारलेले ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, , ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही लक्षात राहीली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!
WhatsApp Group