Google Ad
Uncategorized

मराठा आरक्षण वनवास यात्रा उधळणार ; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० एप्रिल) : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तुळजापूर येथून निघणारी मराठा आरक्षण वनवास यात्रा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.ही यात्रा म्हणजे निव्वळ स्टंट आहे. काही जण स्वतःच्या स्वार्थांसाठी ही यात्रा काढत असल्याचा आरोप आता मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आला आहे.

या यात्रेस मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. ही यात्रा निघाल्यास ती उधळून लावू , असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने अर्जुन साळुंखे आणि महेश गवळी यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी येत्या सहा मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रेचे प्रस्थान होणार आहे.

Google Ad

तुळजापूर ते मुंबई मंत्रालाय असे जवळपास पावणे पाचशे किलोमीटरची ही यात्रा आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात होत नाही, अधिकृत ‘जी आर’ निघत नाही, तोपर्यंत मुंबईतच ठिय्या मांडून बसणार, कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही, यात्रेच्या संयोजकांनी सांगितले.

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची पुनर्विचार याचिका नुकतीच फेटाळली आहे. मराठा आरक्षणाचा सरकार कायदेशीर लढा देणार आहे. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला.

क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, याशिवाय आपल्याला आता मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विस्तृत पाहणी करावी लागेल. हे करताना नेमण्यात येणारी संस्था सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असणे गरजेचे आहे. या संस्थेस सर्व प्रकारच्या सुविधा, मनुष्यबळ, प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!