Categories: Uncategorized

मराठा मोर्चाचा इशारा… अजित पवार यांना बारामतीमध्ये येण्यास बंदी, आल्यास आंदोलन करु

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ ऑक्टोबर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्येच येण्यास बंदी करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे.

कारखान्याच्यावतीने उपमुख्यमंत्री पवार हे येणार, असे सांगण्यात आले तर मराठा समाजाच्यावतीने ते येऊ नये अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी पुतळ्यासमोर मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. जर अजित पवारांना मोळी पूजनाला बोलवले तर हजारोंच्या संख्येने आम्ही जमू त्याची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहिल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाप्रमाणे काही संचालकांनीदेखील मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, आलात तर आंदोलन करु, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला येवू नये, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आली होती. यावर तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रशासन पोलीस प्रशासन आणि सकल मराठा समाजाची संयुक्त बैठक कारखान्याच्या शिवतीर्थ कार्यालयात झाली. ती बैठक निष्फळ ठरली.

अजित पवारांना बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास मराठा क्रांती मोर्चानं विरोध केला होता. अजित पवारांना बोलावू नका, त्यांनी येऊ नये आशा आशयाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि साखर कारखान्याला मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिले होते. अजित पवार कार्यक्रमस्थळी आले तर अजित पवारांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. बारामती तालुक्यात कोणत्याच राजकीय पक्षाच्या लोकांना बारामती फिरु देणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली. पत्र दिल्यानंतर आज सहकारी साखर कारखान्याच्यावतीने पुन्हा एकदा या मुद्द्यावर पुनर्विचार करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली आणि त्यांनी येऊ नये, या भूमिकेवर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते ठाम असल्याचं समोर आलं.

Maharashtra14 News

Recent Posts

अखेर राज्य मंत्रिंमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते मंत्रालय

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…

10 hours ago

पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…

3 days ago

अखेर खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला! महसूल फडणवीसांकडे, अर्थ खाते अजितदादांकडे, तर ….

महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…

4 days ago

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज … हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारची लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…

5 days ago

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…

7 days ago

शपथ घेतल्यानंतर पहिल्या तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…

2 weeks ago