Google Ad
Uncategorized

मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम; शिष्टमंडळाची बैठक निष्फळ! नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जानेवारी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो आंदोलक आता मुंबईच्या वेशीवर आले आहेत. २६ जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

आज जरांगे पाटील यांचा ताफा लोणावळ्यात पोहोचला आहे, तर दुसरीकडे सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्यासोबत बैठक घेतली, पण ही बैठक निष्फळ ठरली आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोनाला येण्यासाठी ठाम आहे.

Google Ad

“शिष्टमंडळाच्या बैठकीत ५४ लाख नोंदीबाबत चर्चा झाली आहे. सग्या सोयऱ्यांच्याबाबत चर्चा झाली. बैठकीत ते म्हणाले, याबाबत आता अध्यादेश काढण्याचे काम सुरू आहे. मग मी त्यांना म्हणालो, आम्ही मुंबईकडे निघालो आहे. आंदोलन आम्ही थांबवणार नाही, असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जरांगे पाटील यांच्यासोबतची ही बैठक निष्फळ ठरली आहे. जरांगे पाटील आंदोनवार ठाम आहेत. आता आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आता आलेले हे सरकारचे शिष्टमंडळ नव्हते तर ते अधिकारी होते, असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आज मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांनी नोटीस दिली. या नोटीसमध्ये पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, पण तरीही हे आंदोलन आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली.

लाखो मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील लोणावळ्यापर्यंत आले आहेत. दरम्यान, आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात परवानगी नाकारली आहे. काल हायकोर्टात या आंदोलनाबाबत एक सुनावणी झाली या सुनावणीत हायकोर्टाने मुंबई पोलिसांना याबाबत आदेश दिले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आंदोलक येणार आहेत. आझाद मैदानावर एवढी मोठी क्षमता नाही तर बाकीच्या मैदानावर अन्य नियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळे मुंबईत या मोर्चाला परवानगी दिलेली नाही, असंही मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे हा मोर्चा मुंबईत न येता खारघर येथील मैदानावर सुरू ठेवावे. तसेच याच्या परवानगी संबंधीत कार्यालयातून घ्याव्यात, असं या नोटीसात कळवण्यात आले आहे. काल हायकोर्टाने याबाबत सूचना दिल्या होत्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!