महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ जुलै) : ओम नमो परिवर्तन परिवार, आविष्कार क्लब यांच्या संयुक्त विद्यमातून पिंपळे गुरव येथील निळूफुले नाट्यगृहमध्ये रविवारी (दि. २२) ‘मंगळागौर खेळ स्पर्धा २०२३’ उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण अकरा ग्रुपने सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत विविध परिसरातून मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. रसिक प्रेक्षकांनी देखील मोठया प्रमाणात गर्दी करून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.
सालाबादप्रमाणे यंदाही ओम नमो परिवर्तन परिवार, आविष्कार क्लबने पुढाकार घेत ‘मंगळागौर खेळ २०२३’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत एकूण अकरा ग्रुपने सहभाग नोंदविला होता. यामध्ये प्रथम क्रमांक जुनी सांगवी येथील सदाफुली ग्रुपच्या शालिनी पाठक, हेमा गवळी, कल्पना जगदाळे, अश्विनी, सोनाली कसरुंग, अश्विनी सूर्यवंशी, सीमा करे, संगीता जायभाई, सुरेखा चौधरी, उषा , वैजयंती जोशी या टीमने यांनी मिळविला. या ग्रुपमधील वैजयंती जोशी यांनी स्वतः गाणी गायली आहेत. द्वितीय क्रमांक संस्कृती ग्रुप सीमा राणे आणि तृतीय क्रमांक मोगरा ग्रुप स्मिता अत्रे यांनी मिळविला. या विजेत्यांना संस्थापिका डॉ. वैशाली लोढा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मंगळागौर स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे ५ वर्षाच्या मुलींपासून ते ८४ वर्षाच्या आजी पर्यंतच्या महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. ‘बाईपन भारी देवा‘ या एका चित्रपटाने प्रत्येक स्त्रीच्या अंतरमनाला साद घातली व तिला नव्याने जगण्याची उमेद दिली. त्याचप्रमाणे संस्कृतीचा तसेच आधुनिकतेचा वारसा पुढे नेत सहभागी ग्रुपने पारंपरिक मंगळागौर स्पर्धेत गाण्यांच्या थिरकत्या तालावर पिंगा, फुगडी, झिम्मा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा यासारख्या खेळांचे आदी प्रकार आपल्या नृत्यातून सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेत ५ वर्षांपासून ते ८४ वर्षापर्यंतच्या आजी सहभागी झाल्याचे दिसून आले. प्रत्येक सहभागी महिलेला मिळालेली ट्रॉफी ही नवीन ऊर्जा देणारी असणार आहे. प्रसिद्ध कलाकार ईशान गोडसे यांनी कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मीनल गोडसे, भक्ती थोरात लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्णाली जगताप, नीलिमा आहिरराव, मयुरा साळुंके व उज्वला म्हस्के यांनी केले.
यावेळी सोनाली गाढवे, छाया सावंत, सीमा नरदे, प्रतिमा आदम, उज्वला दरेकर, युगंधरा कदम, अपर्णा कोडगिरवार, पूनम क्षीरसागर, मनीषा नेजे, विजया नागटीळक, स्मिता शेजुळ, स्मिता सोने, शिवाजी राणे, अतुल कदम यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
महिलांच्या कल्पकतेला एक व्यासपीठ मिळावे यासाठीयाकरिता आमचा ग्रुप हे कार्य करत असतो, प्रत्येक भारतीय सण-उत्सवामागे एक कारण दडलेले आहे. मंगळागौरमधून विविध कलागुण जोपासले जातात. यातून आरोग्यदायी, व्यायामाची भर पडते. आजच्या पिढीने हे अवगत केले पाहिजे. भारतीय हिंदू संस्कृतीचे जतन व पारंपारिक वारसा पुढे नेहून समाजाला एक दिशा देण्याचे कार्य करणे हा ग्रुप चा हेतू आहे.
• शालिनी फाटक, जुनी सांगवी
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…