Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Manchar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्याचा खून … मृतदेह आणि मोटार जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६मे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते धामणी (ता. आंबेगाव) सचिन राजाराम जाधव (वय 42) यांचा खून करून मृतदेह आणि मोटार जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. ही घटना मंगळवारी (दि. 25) रात्री पोंदेवाडी येथे घडली. व्यवसायाच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

याबाबतची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी पाच ते सहा तासांच्या आत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंचर येथे बुधवारी (दि. २६) रात्री ही माहिती दिली. अधिक माहितीनुसार, धामणी येथील सचिन राजाराम जाधव मंगळवारी रात्री घरी न आल्याने त्यांचा पुतण्या रोहन जाधव यांनी मंचर पोलिस ठाण्यात त्याबाबत तक्रार दिली.

Google Ad

पोंदेवाडी-काठापूर रस्त्यालगत एका ठिकाणी बुधवारी सकाळी नागरिकांना रक्ताचे शिंतोडे, चपलांचा जोड, कंगवा आढळून आला. स्थानिकांनी तत्काळ ही माहिती पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांना दिली. याची माहिती मिळताच पोलिसांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी अनिल लंबाते, निरीक्षक सुधाकर कोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. खून झाल्याचा प्राथमिक अंदाज धरून तपास वेगाने फिरवला. यात पोलिसांना जाधव यांच्या व्यवसायाची माहिती मिळाली.

त्यावरून पोलिस दोन तासात आरोपीपर्यंत पोहचले. चारच तासात गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
पोंदेवाडी फाट्यावर सचिन जाधव यांचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील कोथरण खंडोबा परिसरातील घाटात जाधव यांची गाडी व मृतदेह जाळून विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला.

या प्रकरणात 4 आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी बाळशीराम थिट, विजय सूर्यवंशी अशी अटक केलेल्यांची नावे असून, इतर दोन आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. अधिक तपास करीत असल्याचे मंचर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!