Google Ad
Articles Editor Choice kolhapur

‘मनस्वी’ने पहिला पगार दिला कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी … शिराळ्याच्या कन्येचा कौतुकास्पद उपक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज : प्रत्येक व्यक्तीला आपला पहिला पगार हा त्याच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो, परंतु याला काही लोक अपवाद असतात, अशीच शिराळा तालुक्यातील एक कन्या मनस्वी हिचे वडील रघुनाथ निकम हे पिंपरी चिंचवड शहरातील ‘श्री गणेश सहकारी बँकेमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांना वाचविण्यासाठी कुटुंबाने खुपसारे प्रयत्नही केले, परंतु त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली आणि अखेर निकम यांचे कोरोनाने निधन झाले.

निकम यांची कन्या ‘मनस्वी’ हे सर्व अनुभवत होती, ती या दुखःद घटनेची साक्षीदार होती. आपल्या कुटुंबावर आलेला प्रसंग कोणावरही येऊ नये, यासाठी संकट काळात गरजूंना आपल्या हातून काहीतरी मदत व्हावी, ही भावना तिला स्वस्थ बसू देत न्हवती. समजात पाऊल टाकण्याची तिची ही सुरुवात होती, आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने तिने आपला पहिला पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे आगळे वेगळे कार्य केले आहे .

Google Ad

मनस्वी पुणे येथील खासगी कंपनीत प्रोग्रामर अनलिस्ट म्हणून काम करीत आहे, आई संध्याराणी निकम या शिराळा तहसीलदार कार्यालयात अव्वल कारकून आहेत . मनस्वीला पुण्यात नोकरी मिळाली . तिचा पहिला पगार आल्यावर सर्व कुटुंब भावनावश झाले . या आनंदाच्या क्षणी मात्र वडील हवे होते असे सर्वानाच वाटत होते. हा आनंदाचा क्षण दुसऱ्या एखाद्या कुटुंबाला मिळावा असा विचार करून मनस्वी , तिची आई संध्याराणी , भाऊ सुयश यांनी हा पगार मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय घेतला . त्यांनी वाळवा तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे पगाराच्या सर्व रकमेचा धनादेश सुपूर्द केला. ‘मनस्वी’च्या या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

‘मनस्वी’ च्या या कार्यास सलाम …!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!