Google Ad
Editor Choice

केंद्र सरकारकडून Driving License नियमांत मोठा बदल , 1 जुलैपासून लागू होणार हा नवा नियम!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मे) : जर तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा किंवा रिन्यू करण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमांचं सर्वसामान्यांना फायदा होऊ शकतो. हे नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (RTO) जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारकडून बनवण्यात आलेले ड्रायव्हिंग लायसन्सचे नवे नियम आधीच्या नियमांच्या तुलनेत अधिक सहज-सोपे आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नव्या नियमांनुसार, आता तुम्हाला कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट RTO मध्ये जावून द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून नवे नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळेल.

Google Ad

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आता RTO मध्ये टेस्ट देण्याची वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही DL साठी कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. इथूनच ट्रेनिंग घेतल्यानंतर इथेच टेस्ट पास करावी लागेल. टेस्ट पास करणाऱ्यांना ट्रेनिंग स्कूल एक सर्टिफिकेट देईल. या सर्टिफिकेटच्या बेसवर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनवलं जाईल.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही द्यावं लागेल. लाइट मोटर व्हीकलसाठी कोर्सचा कालावधी चार आठवड्यांचा आहे, जो 29 तास असेल. प्रॅक्टिकलसाठी रस्ते, हायवे, शहरातील रस्ते, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग अशा प्रॅक्टिकलसाठी 21 तासांचा वेळ द्यावा लागेल. इतर 8 तास थेअरीसाठी असतील.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून ट्रेनिंग सेंटरसाठी गाइडलाइन्स देण्यात आल्या आहेत.

– दुचाकी, तीनचाकी आणि हलक्या मोटर वाहनांसाठी ट्रेनिंग सेंटर्ससाठी कमीत कमी एक एकर जागा असावी. अवजड वाहनं किंवा ट्रेलरसाठी ट्रेनिंग सेंटर्सकडे दोन एकर जागा असणं गरजेचं आहे.

ट्रेनिंग सेंटरमधील ट्रेनर कमीत-कमी 12वी पास असणं गरजेचं आहे. त्याशिवाय कमीत-कमी पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणंही आवश्यक आहे.

– ट्रेनिंग सेंटरवर बायोमेट्रिक सिस्टम असणं गरजेचं आहे.

ड्रायव्हिंग सेंटर्समधील अभ्यासक्रन थेअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन भागात असणं गरजेचं आहे.

– मीडियम आणि हेवी मोटर व्हीकलसाठी 6 आठवड्यात 38 तासांचा कोर्स अवधी असावा. यात 8 तास थेअरी आणि 31 तास प्रॅक्टिकल असावं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!