Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महापौरांच्या सांगवीतील विकासकामांचे काय ?… विरोधकांच्या या प्रश्नांकडे माई ढोरे यांनी दिले लक्ष …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जुलै) : पिंपरी – चिंचवड शहराच्या महापौर पदावर जवळ पास दोन वर्ष होत आले सांगवीच्या माई ढोरे यांना संधी मिळाली व नक्कीच तेव्हा पासून सांगवीकरांच्या आशा अपेक्षा देखील वाढल्या सांगवी मध्ये नवनवीन प्रकल्प येतील असा विश्वास तयार झाला . पिंपळे गुरवमध्ये सुमारे ५०० कोटींची कामे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असताना शेजारी महापौर माई ढोरे यांच्या सांगवीतील विकासकामांचे काय ? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला होता . त्यात त्यांनी प्रसिध्दीपत्रात महापौर माई ढोरे यांना आजवर एकही मोठा प्रकल्प आणता आला नाही याबाबत खंत व्यक्त केली होती.

त्यांच्या या पत्रकात शितोळे यांनी त्यावेळी म्हटले होते , सांगवीतील महापौर असल्याने आम्ही सांगवीकर म्हणून त्यांना सहकार्य करण्यास कधीही कमी पडणार नाही . त्याचाच एक भाग म्हणून शितोळे परिवाराने सांगवीतील महापौर पदाच्या काळामध्ये सांगवीचा मान राखला जावा महापौरांनी सुद्धा या भागात अनेक प्रकल्प केले आहेत, असा त्यांचाही गौरव व्हावा यासाठी सांगवी येथील सर्वे नंबर ३ मधील संस्कृतिक केंद्राचे व क्रीडांगणाचे आरक्षण तसेच सांगवी बोपोडी पुलाला आवश्यक असणारी खाजगी जागा देण्याची तयारी दर्शविली व तसे लेखी कळविले देखील आणि ती जागा ताब्यातही दिली. या गोष्टीला आज जवळपास दीड वर्षे झाली आणि आता सांगवी बोपोडी पुलाचा प्रकल्प मार्गी लागला, राजकारण काहीही असो परंतु सांगवीकरांनी ठेवलेली अपेक्षा मात्र महापौर हे सर्वोच्च पद असताना सुरुवात होत आहे याचे नागरिकांना समाधान वाटणार हे नक्की …

Google Ad

सांगवी परिसरातून पुण्याच्या बोपोडी , पुणे विद्यापीठ , रेंजहिल्स , औंध रस्ता व खडकीच्या दिशेने ये – जा करण्यासाठी प्रशस्त असा पुल मुळा नदी पात्रावर उभारला जाणार आहे . त्यासाठी ३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे . या पुलामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सतावत असलेली या भागांतील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे . गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचे काम रखडले होते . बोपोडीतील स्मशानभूमीच्या बाजूने होणाऱ्या पुलामुळे तेथील अनेक घरे बाधित होणार होती . त्यामुळे त्या पुलास विरोध झाला . त्या जागेत बदल करून , त्यावेळी प्रशांत शितोळे हे नगरसेवक असताना व अजितदादा पवार हे पालकमंत्री असताना त्यांनी कृषी विद्यापीठाची जागा ही पुणे मनपा हद्दीत असल्याने ती जागा ताब्यात मिळावी म्हणून पाठपुरावा केला होता, व अजित पवार यांनी त्यावेळीचे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि विभागीय आयुक्त यांची बैठक घेऊन जागा ताब्यात देण्याबाबत आदेश दिले होते.

आता सांगवीतील ममतानगर येथील दत्त आश्रम मठापासून शितोळे यांनी दिलेल्या जागेतूनच पुणे विद्यापीठामागील चंद्रमणीनगरच्या शेजारच्या कृषी महाविद्यालयाच्या जागेत हा ७६० मीटर लांबीचा दोनपदरी पुल उभारण्यात येणार आहे . या पुलामुळे बोपोडी , पुणेविद्यापीठ , रेंजहिल्स , खडकी , औंध रस्ता या दिशेला ये – जा करणे . पुण्यातून सांगवी , नवी सांगवी , दापोडी , पिंपळे गुरवला जाणे सुलभ होणार आहे . तसेच या पुलामुळे सांगवीकरांची वाहतूक कोंडीतुन सुटका होणार व विरोधकांच्या बरोबर सांगवीकरांच्या अपेक्षाही पूर्ण होणार हे नक्की …

हा पुलाचा प्रकल्प होत असताना महापौर पदाला शोभेल असे पुलाचे डिझाइन करावे अशी अपेक्षा प्रशांत शितोळे यांनी केली आहे, तसे निवेदनही त्यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे, त्यांची ती अपेक्षा वजा मागणी आता पूर्ण होती का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे… तसेच आणखीही चांगले प्रकल्प आणि सुविधा सांगवीकरांसाठी कराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी महापौरांकडून केली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!