Google Ad
Uncategorized

नागपूरमध्ये महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ सभा’ की ‘वज्रफूट सभा’ अजित दादा नाराज

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ एप्रिल) : आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला मविआचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेमध्ये अजित पवार बोलणा की नाही असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर अजित पवार या सभेत बोलणार नसल्याचं समोर आलं आहे. खुद्द अजित पवार यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

आम्ही महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांनी बसून ठरवलं होतं की राज्यात सहा ते सात सभा घ्यायच्या. त्याची सुरुवात मराठवाड्यातून झाली. आज नागपूरमध्ये दुसरी सभा आहे. सभांना घेऊन माध्यमं विविध बातम्या चालवत आहेत. पण सगळी माहिती घेऊन बातम्या चालविल्या तर बरं होईल, एका सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच मान्यवर भाषण करतील असं आधीच ठरलं होतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Google Ad

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आजच्या सभेत स्थानिक नेते म्हणून अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलणार आहेत. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोललो त्यामुळे आजच्या सभेत बोलणार नाही. काँग्रेसकडून कोण दोन नेते भाषण करतील ते मला माहिती नाही. नाना पटोले आणि सुनील केदार हे बोलण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आणखी कोण बोलणार हे आपल्याला माहिती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सभा आटोपशीर व्हावी जास्त लांब होऊ नये, कार्यकर्त्यांना व्यवस्थित ऐकता यावं हा त्यामागचा हेतू असल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!