महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि ७) रोजी आपला पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज थेरगाव निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, आरपीआय खरात गट, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, योगेश बहल, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, शाम जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर २६ फेब्रुवारीला पोट निवडणूक होत आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडे उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. सोमवारी भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यासोबतच माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी देखील डमी अर्ज सादर केला आहे. तर सोमवारपर्यंत १४ जणांनी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) राहुल कलाटे हे देखील आज अपक्ष अर्ज भरणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे ही पोटनिवडणूक तिरंगी होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
राहुल कलाटे यांचाही उमेदवारीवर दावा :-
दरम्यान, महाविकास आघाडीचा घटकपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राहुल कलाटे यांनी उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांतील खलबतानंतर कलाटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत खलबत सुरू होती. शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीकडून उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…