Google Ad
Editor Choice

महाविकास आघाडी सरकार प्रत्येक गुन्ह्याचे समर्थन करते : आ . चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ ऑक्टोबर) : ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानवर झालेली कारवाई चुकीची असती तर न्यायालयाने मागेच जामीन दिला असता. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्येक गुन्ह्याचे समर्थन करत आहे, ही बाब गंभीर आहे.

पोलीस अधीकारी सचिन वाझेचेही या सरकारने समर्थन केले होते. उद्या हे लोक न्यायव्यवस्थेवरही आरोप करतील, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

Google Ad

आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या वाझेवर आरोप झाले त्याचेही या सरकारने समर्थन केले होते. ड्रग्ज सारख्या गुन्ह्यात अडकलेल्या आर्यन खानचेही हे लोक समर्थन करतात ही बाब गंभीर आहे. त्याच्यासाठी हे लोक सुप्रीम कोर्टात निघाले आहेत. ही कारवाई चुकीची असती तर न्यायालयाने मागेच त्याला जामीन दिला असता.

 

ते म्हणाले, ईडीची कारवाई ही फक्त विरोधी पक्षातील लोकांच्यावरच होते, हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. खा. संजय पाटील बोलले ते बरोबरच आहे. ते असे म्हणाले की, ज्यांनी राजकारणातून काळा पैसा मिळवून पांढरा केला. म्हणजेच मनी लाँन्ड्रींग केले त्यांच्यावरच कारवाई सुरु आहे. आम्ही असे काही केलेच नाही तर आमच्यावर ईडीची कारवाई कशी होईल. हर्षवर्धन पाटलांचेही तेच म्हणने होते. ईडी, सीबीआय, आयकर विभाग आपआपले काम करत आहेत. उद्या संजय राऊत म्हणतील चंद्रकांत दादांना येवढी माहिती कशी? असा मिश्कील टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शेतकर्‍यांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या तुटपुंच्या मदतीवर बोलताना ते म्हणाले, सरकारने शेतकर्‍यांना आवळा दिला आहे. याच्या निषेधार्थ शेतकरी काळी दिवाळी साजरी करतील, असा इशाराही त्यांनी दिला. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!