Google Ad
Uncategorized

नवी सांगवीतील ‘महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट’ मध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी, साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट मध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पेढे वाटून आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली .

महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट मध्ये दर वर्षा प्रमाणे सर्व भाजी विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन सर्व महापुरुषांच्या जयंती साजरा करतात, या जयंती बरोबर समाज उपयोगी व समाज प्रबोधनात्मक काम करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचे मान सन्मान करतात. यावर्षी राजीव गांधी नगर पिंपळे गुरव येथे एका व्यक्तीचे दोन मुलांनी सामाजिक भान जपून तत्परतेने प्राथमिक उपचार देऊन  एका व्यक्तीचे प्राण वाचवले, ते दोन तरुण म्हणजे संदेश विलास थोरात तर दुसरे आदित्य संजय कांबळे यांच्या या धाडसी कार्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

Google Ad

त्याप्रसंगी बोलताना भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की, “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपण या दोन तरुणांचा जो मान सन्मान केला.त्यांनी केलेली ही कामागिरी खरच खूप कौतुकास्पद आहे आज समाजात एखाद्याचे प्राण घेणे खूप सोपे आहे पण एखाद्याचे प्राण वाचवणे खूप अवघड आणि ही अवघड गोष्ट या तरुणांनी करून दाखवली खऱ्या अर्थाने अशा तरुणांच्या या कार्याचा सर्वत्र सन्मान झाला पाहिजे यातूनच इतर तरुणांना प्रेरणा मिळेल”.

याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे, विलास थोरात, हेमंत बाराथे, नितीन कुचेकर, कुणाल धिवार,रमेश डफळ,गणेश मते,अंकुश आपेट,भरत प्रसात,खंडेराव हल्लाले,सयाजी आगलावे,गणेश पैठणी,नितीन दोधाड,वैभव काळे,अरुण जाधव,बपीराम भोंगे,मनोज शिंदे,नवीन खान, एजास शहा,किरण वाणी,विपुल शिंदे, अंजना शिंदे,नंदा जाधव आधी भाजी विक्रेते व मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!