Google Ad
Editor Choice

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे येथे मातृशक्ति शिबीर संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे येथे मातृशकती चा शिबीर संपन्न झाले विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे वतीने दिनांक ७मे ते १०मे २०२२ या कालावधीत मातामाध्यमातून भारतीय युवतींना सुसंस्कारित आणि स्वसंरक्षणार्थ सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होत, प्रांत उपाध्यक्ष माधवीताई संशी, मुंबई क्षेत्र संघटनमंत्री श्रीरंग जी राजे, प्रांत संघटन मंत्री अनिरुद्ध पंडीत, प्रांत मंत्री संजयराव मुरदाळे, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे आदि प्रमुख उपस्थित होते.

दिनांक ०७मे रोजी प्रशिक्षणार्थी मातृशकती शिबीराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मा. किशोरी ताई कोळेकर मातृशकती क्षेत्र मुंबई क्षेत्र व बंगलोर क्षेत्र उपस्थित होत्या.दुपारी (अ.भा.मातृ.स.सं)सौ.मीनाताई भट्ट यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी सौ.मीनाताई भट यांनी मातृशक्ती कार्यापधती र्विषयीची माहिती दिली. संध्याकाळी महिलांची ओळख आणि परिचय करून दिला.बाल संस्कार केंद्र उभारणी साठी शिबिरामध्ये शारीरिक, बौद्धिक, चर्चाआणि कृती अशा विविध सत्रांच्या माध्यमातून महिलांना शिक्षण देण्यात आले.

Google Ad

दररोज पहाटे साडेचार वाजेपासून ते रात्री सव्वादहा वाजेपर्यंत विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना प्रबोधन करण्यात आले.
पहाटे प्रात:स्मरणात श्लोक, रामनामाचा जप, दिनविशेष, प्रेरक कथा आणि पंचांग सांगितले गेले. शारीरिक सत्रांच्या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी दोन तास योग, प्राणायाम ध्यान ओकार,समता, सतसंग ,गीत खेळ, संस्कार इर्त्यादींचे प्रशिक्षण दिले गेले.. बौद्धिक सत्राच्या माध्यमातून विविध मान्यवर तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यांमध्येसौ. चारुता कडुरकर( यांनी संस्कृती आणि पर्यावरण याविषयीची माहिती दिली..

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!