महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जुलै) : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. विधान परिषदेत शुक्रवारी उद्योगमंत्र्यांनी ही घोषणा केली. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर ‘उद्योगरत्न’ पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे.
याशिवाय तरुण उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजकाला असे तीन पुरस्कार देण्यात येतील. अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…