Google Ad
Uncategorized

महाराष्ट्र राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी विमा योजना; 20 रुपयांत मिळणार 5 लाखांपर्यंत फायदा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ ऑक्टोबर) : विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून अनेक नवीन योजना राबवल्या जातात. स्कॉलरशीपपासून ते चांगल्या भविष्यासाठी अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. अशातच गरजू विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक बाबतीतही मदत करते.

महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी खास विमा योजना जाहीर केली आहे. शाळकरी मुलांपासून ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील लाभ घेता येणार आहे.

Google Ad

या योजनची प्रीमियम सुविधा २० रुपयांपासून सुरु होईल. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर रोजी शासनाने निर्णय जाहीर केला आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने प्रसिद्ध केले आहे. या निर्णयानुसार ही योजना सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी असेल.

1. प्रीमियमसाठी किती पैसे भरावे लागतील?

या विमा योजनेसाठी २० रुपये प्रीमियम भरुन एका विद्यार्थ्यांना १ लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल. ही पॉलिसी वर्षभरासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच जर ६२ रुपयांचा प्रीमियम घेतल्यास ५ लाखांचा कव्हरेज वर्षभरासाठी मिळेल. यातच अपघातानंतर उपचारांसाठी २ लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असल्यास ४२२ रुपये प्रीमियम भरावा लागेल असे म्हटले आहे.

विमा घेणारा विद्यार्थी हा प्राथमिक विमाधारक सदस्य असून महाराष्ट्राच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबध्द, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये शिकणारा असावा. तसेच याचा प्रवेश अर्ज हा शाळा आणि कॉलेजवर अवलंबून असेल.

ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड कंपनीची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. २० ते ४२२ रुपयांच्या प्रीमियम असणाऱ्या योजना असेल तर ६२ रुपये प्रीमियम असलेला पाच लाखांचा वैयक्तिक अपघाती विमा नॅचरल इन्शुरन्स कंपनी ऑफर करेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!