Google Ad
Editor Choice Education Maharashtra

राज्याचा दहावीचा निकाल जाहीर … यंदाही मुलीच ठरल्या अव्वल!

महाराष्ट्र 14 न्यूज : दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला असून पंधरा वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे ९८.७७ टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९२ टक्के इतका लागला. पुणे विभागाचा निकाल ९७.३४ टक्के लागला, तर मुंबई विभागातून ९६.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. दहावीच्या परीक्षेत ९६.९१ टक्के मुली, तर ९३.९० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरम्यान, सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.

Google Ad

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

48 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!