महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनने मांडली लोकप्रतिनिधीकडे आपली कैफियत … अनलॉक ०.३ बद्दल पहा काय म्हणाले?

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या चार महिन्यापासून लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लवकरचं अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील जिम (Gym) पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे? येत्या ३१ जुलै रोजी ‘अनलॉक- २’ चा काळावधी संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात काही नवीन निर्बंध तसेच काही प्रमाणात शिथिलता देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशने आज पर्यंत पालकमंत्री अजित पवार, स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधीना निवेदनात आपली कैफियत अनेकवेळा मांडली, आतापर्यंत लॉकडाऊन संदर्भात आपण जे पण पाऊल उचलले त्याला संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनच्या सर्व जिम ओनर्सने सर्व नियम तंतोतंत पाळले . परंतु त्यामुळे आलेल्या परिस्थितीशी कसे सामोरे जायचे असे प्रश्न या जिम व्यवसायिकांवर पडले आहेत, यावर कृपया मार्गदर्शन करावे अशी मागणी त्यांनी या सर्व लोकप्रतिनिधीकडे केली आहे.

पाच महिने जिम पुर्णपणे बंद आहे – व्यवसाय कसा चालवायचा ? संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये साधारण १०००० पेक्ष्या जास्त छोट्या मोठ्या जिम आहेत या मध्ये ट्रेनर , स्वच्छता कर्मचारी व इतर बरेच लोक आहेत की ज्यांचा उदरनिर्वाह या ठिकाणी चालु आहे त्याच बरोबर जिम साहित्य बनवणारे , सप्लिमेंट शॉप , आहारतज्ञ असे बरेच लोक या वर आपले घर चालवतात. जिम बंद असतानाही पाचही महिन्याचे भाडे चालु आहे . व्यवसाय नसल्यामुळे ते कुठुन द्यायचे ? साफसफाईवाले , सेल्स वाले , प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी यांचा पगार कुठुन द्यायचा ? लाईटबिल , जी.एस.टी , मेंटेनन्स या गोष्टी कशा भरायच्या ? ट्रेनर्स च्या उपासमारीमुळे आणि बेरोजगारीमुळे काही ट्रेनर्सने आणि जिम मालकांनीसुद्धा आत्महत्या केल्या आहेत .

मालक भाडे माफ करायला तयार नाहीत आणि जागा मोकळी करण्यास सांगत आहेत , आम्ही जायचे कुठे ? आमच्या प्रश्नांवर कोणीही स्पष्ट बोलत नाही , आम्ही जायचे कुठे ? तुम्ही बऱ्याच उद्योगांना , शॉप , सलून याना सर्शत परवानगी देऊन चालू करण्याचे निर्देश दिले . मग आम्हाला एकदाही का नाही ? वाईन्स शॉपला परवानगी दिली त्यावेळेस तर अक्षरशः आम्हाला वाळीत टाकल्यासारखे झाले . जिम व्यवसाय निवडून आम्ही खुप मोठे पाप तर नाही ना केले ? व्यायाम करून तसेच त्याच बरोबर योग्य आहार घेतल्याने नागरिकांची प्रतिकार शक्ति वाढते हा संदेश देणारे आम्ही जिम व्यावसायिक आता स्वतःच जबरदस्त मानसिक तनावात गेलो आहोत . साहेब आता आमची सहनशक्ती संपली आहे . आता खरोखरच जीवन मरणाचा प्रश्न आहे . आम्हाला आपणाकडून खुप अपेक्षा आहेत .

या वेळी महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ‘महेंद्र चव्हाण’ आणि कार्याध्यक्ष ‘कृष्णा भंडलकर’ म्हणाले की सर्व लोकप्रतिनिधीना आमची सर्वांची कळकळीची विनंती आहे की , आपण … लॉकडाऊनच्या महिन्यांचे जागेचे भाडे माफ करण्याबाबत . GST 18 % वरून 5 % कमी करण्याबाबत . लाईटबिलमध्ये सवलत मिळण्याबाबत आमचा विचार करावा आणि पुढील अनलॉक प्रक्रियेत सशर्त जिम चालू करण्यास परवानगी द्यावी . महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशन फातर्फे आम्ही आपल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू अशी ग्वाही आपणांस देतो .

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

11 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

18 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago