Google Ad
Articles Editor Choice

‘महाराष्ट्र 14 न्यूज’ आता ई- न्यूज पेपरच्या स्वरूपात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर … पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांच्या सेवेत!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ एप्रिल २०२१ ( चैत्र शु.१ ) : ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ वेब न्यूज पोर्टल ने आता डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले त्याला आज दोन वर्षे होत आहेत. आता वेब पोर्टल, यू ट्यूब, फेसबुक व ट्विटर पेज सुरू असून, आम्ही आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ हे ई-बातमी पत्र वर्तमानपत्र स्वरूपात शुभारंभ अंक सुरू करत आहोत.

डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकण्यामागचा उद्देश म्हणजे आमच्या असंख्य वाचकांना डिजिटल ई-‘महाराष्ट्र 14 न्यूज’ मधून चालू स्थानिक, जिल्हा, राज्यातील, देशविदेशातील घडामोडींपासून मनोरंजन, आरोग्य, कथा, कविता, शेती अशा अनेक विषयांवर माहिती प्रसारित होणार आहे.

Google Ad

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारे माध्यम म्हणून आमच्या ‘महाराष्ट्र14 न्यूज’ ने सुरुवात केल्यापासून आजपर्यंत सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम केले आहे. त्याबद्दल मनोमन समाधान वाटत आहे.

वर्तमानपत्र आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनले आहे. अवतीभोवती समाजात काय घडते हे सर्वकाही बातमीच्या माध्यमातून सर्वांना समजते. दिवसेंदिवस या माध्यमांत बदल घडत चालले आहेत. सध्याचे युग डिजिटल असल्याने काही क्षणातच आपल्याला घडामोडी समजतात, आणि त्याकरिता आम्ही सदैव तत्पर, प्रयत्नशील आहोत. गेल्या एक-दोन वर्षात डिजिटल माध्यमांचे महत्त्व अधिकच वाढले आणि वाचकही वाढले आहे. त्यामुळे अपल्या सारख्या वाचकांच्या शुभेच्छा असाव्यात हीच मनोकामना!

मुख्य संपादक : देविदास शेलार
    🌸महाराष्ट्र 14 न्यूज🌸
         ९८८११००३००

      ई- न्यूज वर्तमानपत्र👇🏻👇🏻

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!