Google Ad
Editor Choice

लालबत्ती परिसरातील महिलांना मूलभूत सुविधा देण्यास महा एनजीओ फेडरेशन कटीबद्ध – शेखर मुंदडा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑगस्ट) : लालबत्ती परिसरातील ९० ज्येष्ठ वृद्ध व बाधित महिला यांच्या समूपदेशन व आरोग्यासाठी प्रयत्नशील राहत प्रत्येक महिलेस वर्षभर आवश्यक तो किराणा सुपूर्द करण्याचे अभिवचन शेखर मुंदडा यांनी यावेळी उपस्थितांना दिले. या उपेक्षित घटका सोबत स्वातंत्र्यदिन साजरा करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आपल्या समजला असे होते असे मत झी २४ तासचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी व्यक्त केले. महा एनजीओ फेडरेशनचे संपूर्ण कार्य आम्ही पाहत असतो अशा संस्थेद्वारे आम्हाला समाजातील वंचित घटका पर्यंत पोहचून सेवा करण्याची संधी मिळाली असे राजेंद्र तापडिया यांनी भावना व्यक्त केली.

७५ व्या स्वातंत्र्य दिन निमित्ताने आपण भेटतोय शब्दात काय बोलावे सुचत नाही आहे .सेवा परमोधर्म च्या माध्यमातून आम्ही आपल्या सोबत आहोत . तिरंग्याचा छत्रछायेखाली आपण सर्व जण आहोत. प्रत्येक रंग आपल्याला एक प्रेरणा देतो. भगवा रंग ऊर्जा, पांढरा रंग शांतता, हिरवा रंग उन्नती ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळत राहो हीच शुभेच्छा प्रदान करत महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही आपल्या सोबत आहोत असे मत सौ. अंजली राजेंद्रजी तापडिया यांनी व्यक्त केले .

Google Ad

महा एनजीओ फेडरेशन सदैव आमच्या प्रत्येक उपक्रमास साह्ययभूत राहत आम्हाला मदत करते याचा आम्हाला मोठा फायदा आमच्या सामाजिक कार्यात होतो. मागील दशकापासून आम्ही लाल बत्ती भागात सामाजिक कार्य करतोय. बुधवार पेठ येथील समस्या मांडता क्षणी शेखर मुंदडा यांनी त्वरित मदत उपलब्ध केली असे मनोगत आशा भट यांनी व्यक्त केले. महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या सेवा कार्याची भूमिका यावेळी उपस्थितांपुढे विषद केली.

यावेळी मंथन फॉउंडेशनचे प्रमुख आशा भट व दीपक निकम व महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, राहुल पाटील, शशांक ओंभासे , प्रणिता जगताप, गणेश बाकले व अक्षयमहाराज भोसले उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांपैकी सोशल रिस्पॉन्सब्लीटीचे विजय वरुडकर व आर्ट ऑफ लिविंगचे महेश सोनी आदी. मान्यवर उपस्थित होते. फेडरेशनच्या ४ थ्या वर्धापन दिनी आवास्तव इतर खर्च न करता सामाजिक कार्याचा बहुमूल्य संदेश महा एनजीओ फेडरेशनने आपल्या कार्यातून दिला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!