Google Ad
Uncategorized

मोबाईल हरवला किंवा चोरी झाला आहे का? काळजी करू नका! सरकारचे Sanchar Saathi Portal आहे ना … आता असा, शोधता येणार मोबाईल!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑगस्ट) :सध्या मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यावर सर्वात मोठी चिंता असते ती त्यामध्ये असलेला वैयक्तिक डेटा लीक होण्याची.

जाणून घेऊयात संचार सारथी पोर्टलचा वापर कसा करावा :

Google Ad

तुमचा मोबाईल जर का हरवला असेल, तर तो ब्लॉक करण्यासाठी तसेच ट्रॅक करण्यासाठी तुम्ही http://Sanchar saathi portal चा वापर करू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी लागेल. त्या कंप्लेंट नंबरच्या मदतीने संचार साथी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला Tracking Number मिळेल त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या हरवलेल्या मोबाईलचे स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला मोबाईल परत मिळाल्यानंतर तुम्ही याच पोर्टलचा वापर करून त्याला अनब्लॉक सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही sanchar saathi portal चा वापर करू शकता.

मोबाईल हरवल्यावर किंवा चोरी झाल्यावर कसा ब्लॉक करावा

संचार साथी पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला  https://sancharsaathi.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल .

– आता तुम्हाला होमपेजच्या Citizen Centric Services या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– या पर्यायानंतर तुम्हाला तुमच्या हरवलेला किंवा चोरलेला मोबाईल ब्लॉक करण्याचा पर्याय मिळेल.

– Block Your Lost पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म मिळेल.

– हा फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि नंतर मोबाइल नंबरसह IMEI नंबर नमूद

तुम्हाला स्मार्टफोनचा मॉडेल नंबर, मोबाइल खरेदीचे बिल देखील अपलोड करावे लागेल.

– आता तुम्हाला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्याची तारीख, वेळ, जिल्हा आणि राज्याची माहिती द्यावी लागेल.

– यासोबतच तुम्हाला एफआयआरची प्रतही जोडावी लागेल.

– आता तुम्हाला वैयक्तिक माहिती जसे की नाव, ईमेल आयडी, पत्ता इत्यादी द्यावे लागेल.

– शेवटी तुम्हाला डिस्क्लेमर निवडून फॉर्म सबमिट करावा लागेल.

– फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा स्मार्टफोन ब्लॉक केला जाईल.

तक्रारीसाठी हे लक्षात ठेवा

संचार साथी पोर्टलवर तुमच्या नावावर किती सिमकार्ड सक्रिय आहेत हे देखील तुम्ही शोधू शकता. जर तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला असेल तर तुम्ही या पोर्टलवर तक्रार कशी नोंदवू शकता. मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तक्रार नोंदवण्यासाठी IMEI नंबर असणे आवश्यक आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!