Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Lonikalbhor : २८ वर्षीय पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाची हत्या करुन पतीने केली आत्महत्या 

महाराष्ट्र 14 न्यूज : 28 वर्षीय पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बेरोजगारीला कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

हनुमंत शिंदे असं पत्नी-मुलाची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे. हनुमंतने 28 वर्षीय पत्नी प्रज्ञा शिंदे आणि एक वर्षांचा मुलगा शिवतेज शिंदे यांची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर हनुमंतने गळफास घेत स्वतःचंही आयुष्य संपवलं. यामुळे शिंदे कुटुंब राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

Google Ad

बेरोजगारीला कंटाळून हनुमंत शिंदे याने कुटुंबाला संपवल्याची माहिती आहे. हत्या आणि आत्महत्या प्रकरणी पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशमधील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात कौटुंबिक हत्या-आत्महत्यांचं वाढतं सत्र पाहायला मिळत आहे. बेरोजगारी वाढल्याने अश्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!