{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात झाली. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत दिंड्या उंडवडी मुक्काम उरकून आज बारामती आणि वाल्हे मुक्काम उरकून नीरा स्नान करून लोणंद येथे दाखल झाल्या. जगद्गुरू श्री संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. वारीत सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झाला आहे.
नीरा येथे दरवर्षी वारकरी ज्या दिवसाची वाट बघत असतात, आज हा नीरा स्नान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसत होते. आळंदी ते लोणंद हा मोठा टप्प्या पार केल्यावर अनेकांना दिवे घाटा सह चढाई चा थोडाफार त्रास झाला, या वारकऱ्यांच्या थकव्यावर चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने या वारकऱ्यांना मोफत औषधे व सर्व उपचार देऊन मानवतेचे दर्शन घडविल्याचे आज पाहायला मिळाले. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही आरोग्य सेवा रात्री ११ वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होती.
आषाढी वारी निमित्त पायी दिंडीतील वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवार व चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने अंबुलन्स व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली आहे. गेली अनेक वर्ष हीनिरंतर मोफत औषधे वैद्यकीय सेवा पुणे ते पंढरपूर दोन्ही पालखी मार्गावर दिली जाते. या सेवेत सर्व औषधे जगताप परिवाराकडून मोफत दिली जातात. या वर्षी सुद्ध या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यासाठी मोफत औषधे देण्यात आली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…