महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० डिसेंबर) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थ असलेले संजोग वाघेरे यांनी उबाठा गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाताला शिवबंधन बांधून त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे. यावेळी ठाकरे गटाचे संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पन्नास खोके आणि इकडे स्कॉर्पियो बुलेरो लाथाडून Sanjog Waghere संजोग हे आमच्याकडे आले आहेत. त्यांना या परिवारात उद्धव ठाकरे यांनी सामावून घेतले. आता आपल्याला लढायचे आहे, असे संजय राऊत म्हणाले. मावळताना शिवसेनेचा सूर्य 2024 मध्ये तेजाने उगवताना दिसेल. मावळ मतदारसंघ आपल्याला परत खेचून आणायचा आहे. याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. ज्यांनी महाराष्ट्राचा, मातोश्रीचा अपमान केला, त्यांना आपली ताकद दाखवायची आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.
उबाठाचे दिशादर्शक संजय राऊत!
यावेळी बोलताना संज्योग वाघेरे म्हणाले की, “माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम सुरु केला तेव्हाच मी भावूक झालो होतो. संजय राऊत मीडियाच्या माध्यमातून दररोज सकाळी काही ना काही दिशा देण्याचे काम करत असतात. मी पिंपरी-चिंचवडमध्ये चांगले काम करेन,” असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनीच संजोग वाघेरेंना शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. संजोग वाघेरेंचा हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…