Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहर भाजप महिला मोर्चातर्फे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या (SSC Board आणि HSC Board) च्या विद्यार्थ्यांप्रमाणे, CBSE आणि ICSE बोर्डच्या विद्यार्थ्यांनाही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याची केली मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ ऑक्टोबर) :  आमदार  लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभेचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार उमाताई खापरे यांच्यासमवेत भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. उज्वला गणेश गावडे यांनी आज मंगळवार दिनांक १८/१०/२०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा.आयुक्त श्री. शेखर सिंह साहेब यांची भेट घेतली.

यावेळी पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चातर्फे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या (SSC Board आणि HSC Board) च्या विद्यार्थ्यांप्रमाणे, CBSE आणि ICSE बोर्डच्या विद्यार्थ्यांनाही महापालिकेच्या ८० % ते ९०% व ९०% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर सध्या ऑनलाईन पद्धतीने फार्म भरणे सुरु असल्यामुळे काही मुलांना आणि पालकांना ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत आहेत. तरी हे फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरु ठेवण्याचीही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Google Ad

यावेळी सत्तारूढ पक्षनेते श्री. नामदेव ढाके, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. विलास मेडिगेरी, नगरसेविका सौ. अनुराधा गोरखे, सौ. शैलजा मोरे, सौ. शर्मिला बाबर, सौ. योगिता नागरगोजे, त्याचबरोबर महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ. सोनम मोरे, सौ. कविता भोंगाळे, प्रभाग अध्यक्षा सौ. रेखा काटे, सौ. कोमल गौंडाडकर व इतर माननीय पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!