Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण यांचे वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार* या वर्षी पिंपरी चिंचवड येथील येथील सामाजिक कार्यकर्ते व लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब शेलार यांना जाहीर झाला आहे.

श्री बाळासाहेब शेलार यांनी सन २०१७ मध्ये लोहार उत्सव समितीची स्थापना करून आपल्या समाज कार्याची सुरुवात केली. त्यानंतर लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करून विविध उपक्रम सुरू केले. आज रोजी संस्थेच्या अंतर्गत लोहार उत्सव समिती, उद्योग समिती, ऐतिहासिक सहल समिती, भक्ती शक्ती महिला मंडळ, विश्वकर्मा एंटरटेनमेंट, वधू वर पालक सहाय्यक या समितींच्या माध्यमातून विश्वकर्मा जयंती महोत्सव, घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा, उद्योजक,व्यावसायीक मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,रक्तदान शिबीर, कलाकार आपल्यातला, तर महिलांसाठी खेळ पैठणीचा, हळदी कुंकू, महिला दिन, सावित्रीबाई फुले जयंती, पुण्यतिथी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच संस्थेचे वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कार, ज्ञानज्योती पुरस्कार असे पुरस्कार दिले जातात. या उपक्रमांमुळे लोहार समाज बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्रातील एक नावाजलेली संस्था झाली आहे. संस्थेचे माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात परिसरातील जवळपास चार हजार कुटुंबे एकत्र जोडली गेली आहेत.

Google Ad

बाळासाहेब शेलार यांना याआधीही दोन वेळा समाज भूषण पुरस्कार तर एकदा राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार मिळाला आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि सामाजिक कार्यातील सहभाग लक्षात घेऊन त्यांची *गाडी लोहार समाज उन्नती मंडळ राज्य स्तरीय जीवन गौरव पुरस्कारा* साठी निवड केली आहे.

गाडी लोहार समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने दि. २१ जूलै रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात मान्यवराच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!