Categories: Uncategorized

लक्ष्मणभाऊंच्या कार्याचे आपण स्मरण ठेवूया, पिंपरी-चिंचवडकरांचा स्वाभिमान जागृत ठेवूया! … अश्विनी लक्ष्मण जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ फेब्रुवारी) : आमदार लक्ष्मण जगताप यांचे ०३जानेवारी रोजी दुःखद निधन झाले, आणि लगेचच विधानसभा पोटनिवडणुक लागली, एक महिनाही पूर्ण होत नाही तोपर्यंत ही निवडणूक लागल्याने त्यांच्या पत्नीला या निवडणुकीस सामोरे जावे लागले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी ही देण्यात आली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराकरीता भाऊंनी पाहिलेले स्वप्न आणि या स्वप्नाला पूर्णत्वाला नेण्यासाठी अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जनतेला नम्र आवाहन केले आहे, की ..

 प्रिय मतदार बंधू-भगिनींनो, सस्नेह नमस्कार!

पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास आणि स्वाभिमान आपल्या कार्यातून जागृत ठेवणारे लोकनेते आ. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे निधन होवून एक महिनाही होत नाही, तोच पोटनिवडणुकीची घोषणा झाली. अद्याप आमचे कुटुंबीय दुःखातून सावरलेले नाहीत. मात्र लोकनेते आ. लक्ष्मणभाऊंची पक्षनिष्ठा आणि विचारांचा वारसा अविरतपणे चालवण्याचा संकल्प आमच्या कुटुंबाने केला आहे.

भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रा.स.प., रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना, प्रहार संघटना महायुतीच्या नेत्यांनी अधिकृत उमेदवार म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. आपल्या साथीने ही जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला आहे. सुमारे ३७ वर्षे आदरणीय भाऊंनी शहराच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला ‘स्मार्ट सिटी’ आणि

‘मेट्रो सिटी’ बनवण्यासाठी भाऊंनी पुढाकार घेतला. मात्र नियतीने भाऊंचे नेतृत्व आपल्यातून हिरावून घेतले.

भाऊंच्या राजकीय सामाजिक वाटचालीत मी गेली ३० वर्षे सावलीप्रमाणे साथ दिली. आमचे कुटुंबप्रमुख म्हणून भाऊंनी

आमच्यावरही लोकहितासाठी कायम कटिबद्ध राहण्याचे संस्कार दिले आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी व माझ्या

सहकाऱ्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली. भाऊंच्या संस्कारांची शिदोरी आणि विचारांचा वारसा चालवण्याचा संकल्प आमच्या कुटुंबाने केला आहे.

भाऊंची चिंचवड विधानसभा मतदारसंघासह पिंपरी चिंचवड शहरावर आभाळाएवढी माया होती. शहरातील प्रत्येक काम योग्यच झाले पाहिजे, असा आग्रह धरीत त्यांचे सर्व कामांमध्ये बारकाईने लक्ष होते. आजच्या घडीला राज्यातील सर्वाधिक विकसित असलेला मतदार संघ म्हणून चिंचवडची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाते. ती केवळ कारखानदारीसाठी मर्यादित राहू नये यासाठी भाऊंनी समाविष्ट गावांच्या विकासाला चालना दिली. आयटी हब आणि मेट्रो सिटी असलेल्या आपल्या शहरातील नागरिकांची जीवनशैली उंचावण्यासाठी भाऊंनी पुढाकार घेतला. ही बाब आपणांस ज्ञात आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला ‘मेट्रो सिटी’ करण्याचे स्वप्न भाऊंनी पाहिले आणि या स्वप्नाला पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण नियतीपुढे कोणाचे चालत नाही असे म्हणतात तेच झाले. ज्या स्वप्नासाठी भाऊंनी संघर्ष उभा केला ते स्वप्न अपूर्ण राहिले. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे.

भाजपा + बाळासाहेबांची शिवसेना महायुतीचे सर्व पक्षश्रेष्ठी, राज्याचे नेते मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह सर्व ज्येष्ठांचे मार्गदर्शन, मायबाप मतदारांचे आशिर्वाद आणि जगताप कुटुंबावर तमाम पिंपरी-चिंचवडकरांचा असलेला विश्वास यांच्या साथीने मी या पोटनिवडणुकीला सामोरी जात आहे. आपला विश्वास, भाऊंचे विचार, आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत निश्चित आपण यशस्वी होवू. याची मला खात्री आहे..

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीला कामाला गती! … नागरिकांना मिळणार महापालिकेच्या सर्व सुविधा एकाच छताखाली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…

10 hours ago

चार वर्षात ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला थकबाकी नसलेल्याचा दाखला

  यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…

14 hours ago

जवानांना राख्या बांधून सांगवीच्या ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा रक्षाबंधन सण उत्साहात

  आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…

18 hours ago

रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद २३ वर्षांच्या अथक प्रवासात ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४५०० प्रयोगांचा यशस्वी पल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…

18 hours ago

कबुतरे महत्त्वाची, रहिवासी नाहीत का ?? नागरिकांनी केला मोठा प्रश्न तर, पुण्यातही वाद पेटला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…

1 day ago

देवांग कोष्टी समाजातील मागील दीड वर्षापासून चा वाद संपुष्टात

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…

2 days ago