Google Ad
Editor Choice

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन घेतली आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ एप्रिल) : माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १७,रविवार) खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू शंकरशेठ जगताप, विजूशेठ जगताप यांच्याशी चर्चा करून धीर दिला, तसेच रुग्णालयातील डॉक्टरांकडून सर्व माहिती घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी आणि लक्ष्मण जगताप यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले आहे, पिंपरी चिंचवड शहरात आले की लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी त्यांचे जाणेयेने असायचे, त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांच्यावर अनेक वर्षे पक्ष वाढीची जबाबदारी दिली होती, आणि जगताप यांनी पक्ष वाढवत ती चांगल्या प्रकारे पार देखील पाडली आणि आपला चाहता वर्ग जमा केला.

Google Ad

त्यामुळे आपला एक सारथी आजारी असल्याचे कळताच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली. व सर्व कार्यकर्त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष महेश दादा लांडगे हेही होते.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ लक्ष्मण भाऊ जगताप राजकारणात सक्रिय आहेत. राजकारण करत असताना भाऊंनी आजवर नव्वद टक्के समाजकारण केले आहे.
असंख्य माणसं विविध क्षेत्रांत उभी केली आहेत. परखड, स्पष्ट ही भाऊंची कामाप्रतीची एक बाजू आहे. मात्र, कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे आणि वरून फणसासारखे मात्र, आतून मृदू मुलायम मनं भाऊंकडे आहे. आणि त्याच नात्याचा अनुभव गेली चार ते पाच दिवस सगळे अनुभवत आहेत, त्यामुळेच त्यांच्यावर मनापासून जीवापाड प्रेम करणारी त्याचे मित्रमंडळी आणि कार्यकर्ते अहोरात्र हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून आहेत आणि त्यांच्या स्वास्थ्या करीता प्रार्थना करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!