Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान, रुद्रराज व कादंबरी प्रतिष्ठानच्या वतीने दापोडी येथे जागतिक मातृदिनानिमित्त उपमहापौर सौ.हिराबाई घुले यांच्या हस्ते पुरस्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ मे) : कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान, रुद्रराज प्रतिष्ठान व कादंबरी प्रतिष्ठानच्या वतीने दापोडी येथे जागतिक मातृदिनानिमित्त आई गौरव पुरस्कार 2021 देण्यात आला .यावेळी सौ.हिराबाई घुले (नानी) उपमहापौर पिं.चिं.म.न.पा व स्वातीमाई काटे नगरसेविका पिं.चिं.मनपा यांना विषेश आर्दश माता पुरस्कार २०२१ माधवी बाईत, अस्मिता कांबळे (मोरे), सुप्रिया साळवी (काटे) यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.

तसेच प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री शेलार , पत्रकार- संगिता पाचंगे, निलवंती गायकवाड, चंद्रभागा भाडाळे, सावित्री काटे,सुवर्णा वीर (वडघुले), हिराबाई काटे या मातांचा सन्मान सौ.हिराबाई घुले उपमहापौर पिं.चिं.मनपा.यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.

Google Ad

यावेळी मनोगत व्यक्त करताना उपमहापौर नानी घुले म्हणाल्या, ‘आईचा आर्शिवाद आईचे प्रेम हेच आजच्या मुलांसाठी सर्वस्व आहे.आजच्या प्रत्येक सुनांनी आपल्या पतीएवढे प्रेम आपल्या सासुवर करावे.सासुला स्वतः ची आई समजवावी यामुळे घरात सुख शांती व आनंदी वातावरण राहते.आईचा आर्शिवाद म्हणजे देवाचा आर्शिवाद या आर्शिवादामुळे आपल्या संसारात गोडी निर्माण होते.आपल्या मुलाला लहानपणापासून मोठे करणेपर्यंत प्रत्येक गोष्टी वर लक्ष असावे. स्वतः ची मुले कसे वागतात ते आईवडिलांनी पहाणे गरजेचे आहे. आई मुलांच्या नात्याबाबत बोलताना त्यांना गहीवरून आले.

यावेळी सरस्वती बाईत,पुनम काटे,सारीका जाधव,पुजा काटे,राजश्री बाईत,आश्विनी काटे,निर्मला बोधे, रोहिणी काटे शारदा पवार, स्वाती काटे, रचना बाईत, गौरी पवार, रूक्मिणी इंगवले, वैशाली जाधव, उज्वला सावंत, सोनम जाधव, पल्लवी काटे ,छाया कांबळे,गायत्री शिवले, सुजाता शिंदे सुजाता बोधे, निर्मला काटे शारदा मोरे , सुनिता नलवडे,मनिषा मोरे ,सुरेखा , मांदळे आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भाडाळे यांनी केले व आभार प्रदर्शन रविंद्र बाईत यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!