स्व. विलासराव देशमुख यांना पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे कार्यरूपी अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६मे) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची आज बुधवारी (ता.२६) ७६ वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या ७६ व्या जयंती निमित्त पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेस कडून आज सरस्वती अनाथ आश्रम संस्था दापोडी येथे धान्य व दैनंदिन वापराच्या व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. बुधवारी दूपारी १२ वा. संस्थेच्या कार्यालयात जाऊन हि भेट सुपूर्द करण्यात आली. ही भेट संस्थाचालक देवीदास सुरवसे यांनी स्वीकारली व युवक काँग्रेस पदाधिका-यांचे त्यांनी आभार मानले.

यामध्ये पीठ,तांदूळ, साखर,मैदा,गूळ,तेल व भाजीपाला आदि पदार्थ देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव अक्षय जैन, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिचंवड शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन.एस.यु.आय.चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश कंधारे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव कौस्तुभ नवले, पिपंरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, शहर युवक काँग्रेस चे सरचिटणीस शंकर ढोरे, अनिल सोनकांबळे, स्वप्निल बनसोडे, विशाल सरवदे, मिंलिद बनसोडे, अर्णव कामठे, तेजस पाटील, ओम शितोळे, मयुर तिखे आदि उपस्थित होते.

एक रुबाबदार व दिलखुलास व्यक्तिमत्त्व, अमोघ वक्तृत्वद्वारे जनसामान्यांच्या मनावर आपली छाप सोडणारे, सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास असलेले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख साहेब यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन चिचंवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

20 mins ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

8 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago