Google Ad
Uncategorized

राज्यातील रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीचा सर्वात मोठा शिव पुराण कथा सोहळा … अन्न दानाकरिता मिळालेला सर्व शिधा जगताप परिवाराकडून सिवोरच्या कूबरेश्वर धामला ट्रक मधून रवाना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ सप्टेंबर) : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर सात दिवस ‘श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन’’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोहळ्याची आज सांगता करण्यात आली. पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक होते.*लक्ष्मणभाऊ जगताप यांची पुण्याई …*

लोकनेते लक्ष्मण जगताप आज आपल्यात नसले तरी त्यांची पुण्याई आपल्यासोबत आहे. त्याच पुण्याईने शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यासाठी जगताप कुटुंबियांना प्रोत्साहित केले. कथा सोहळ्याचे आयोजन ही सहज शक्य गोष्ट नसली, तरी केवळ कर्मच अशा गोष्टी घडविण्यासाठी पाठबळ देते. लक्ष्मणभाऊंची पुण्याई आजही जगताप कुटुंबियांच्या पाठीशी आहे, म्हणूनच त्यांच्या वतीने आयोजित सोहळ्याचा लाभ लाखो नागरिक घेवू शकले आहेत. असे म्हणत पं. प्रदीपजी मिश्रा यांनी जगताप कुटुंबियांचे मनापासून कौतुक केले.*राज्यातील रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीचा सर्वात मोठा शिव पुराण कथा सोहळा…*

Google Ad

गेल्या ७ दिवसांपासून सुरु असलेल्या सोहळ्याच्या प्रत्येक दिवशी भाविकांनी रेकोर्डब्रेक गर्दी केली होती. प्रत्येक दिवशी सुमारे अडीच लाख भाविकांनी या कथा श्रावणाचा आस्वाद घेतला. या ७ दिवसांत सुमारे १८ लाख भाविक प्रत्यक्ष सभामंडपात कथा श्रवणासाठी उपस्थित होते. याबरोबरीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील कोट्यवधी नागरीकांनी या कथेचा आस्वाद घेतला. सोहळ्याचे मुख्य संयोजक शंकर जगताप यांनी सर्व भाविक, साधक आणि पंडित मिश्रा यांचे अनुयायी यांचे आभार मानले. कोणताही अनुचित प्रकार न घडता गर्दीचा उच्चांक मोडीत काढणारा हा पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिवपुराण कथा वाचन सोहळा ठरला. अत्यंत भक्तीमय वातावरणात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याबद्दल भाविकांनीही समाधान व्यक्त केले.

*लाखो भाविक भक्तांनी घेतला अन्न प्रसादाचा लाभ..*

७ दिवसांपासून सुरु असलेल्या या सोहळ्याच्या प्रत्येक दिवशी भाविकांना लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने अन्न प्रसादाचे सकाळ संध्याकाळ वाटप करण्यात येत होते.  साधारणपणे एक एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या अन्न छत्रात ८० ते ९० हजार भाविक भक्त दररोज महाप्रसादाचा लाभ घेत होते. तर एक हजार स्वयंसेवक अन्न प्रसादाचे वाटप करत होते. शेवटच्या दिवशी तर अन्न प्रसादासाठी रेकोर्डब्रेक गर्दी झाल्याचे दिसून आले. परंतु आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे सातही दिवस कोणतीही अडचण आल्याचे दिसले नाही, प्रत्येक दिवशी भाविकांनी आणि साधकांनी लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या स्वयंसेवकांना मदत करत अन्न प्रसादाचे वाटप केले व वेगवेगळ्या मिष्ठान्नचा आस्वाद घेतला.

*भाविक भक्तांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्द्ल मानले आभार…*

पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या कथेस भक्तांच्या अन्न दानातून मिळालेला सर्व शिधा जगताप परिवाराकडून सिवोरच्या कूबरेश्वर धामला ट्रक मधून रवाना करण्यात आला, यावेळी बाहेर गावाहून आलेल्या सर्व भाविक भक्तांना आपल्या घरी कुटुंबाकरिता बुंदीचा प्रसाद पॅकिंग करून देण्यात आला. यावेळी उपस्थित भक्त म्हणाले, की आम्ही अनेक ठिकाणी कथेस जातो परंतु असे इतके उत्कृष्ट भोजन व्यवस्था, आंघोळीची, झोपण्याची, आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, पिण्याच्या पाण्याची जागेवरच व्यवस्था नियोजन आणि आपली यंत्रणा आम्हाला आजपर्यंत कुठेच पहावयास मिळाली नाही, त्यावेळी अनेक भाविक भक्तांनी विजयशेठ जगताप आणि शंकर जगताप आणि लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराचे यांचे कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्द्ल आभार मानले.*आयोजकांनी सर्वांचे मानले आभार..*

यावेळी या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि आयोजक ‘शंकर पांडुरंग जगताप’ यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र शासन, पोलीस यंत्रणा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल, वैद्यकीय विभाग, मंडप व्यवस्था, विद्दुत विभाग, आरोग्य विभाग, पोलीस वाहतूक विभाग तसेच सात दिवस अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचे आणि स्वयंसेवक तसेच मित्र परिवाराचे सहकार्याबद्दल आणि केलेल्या सेवेबद्दल आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!