Categories: Editor Choice

पैशांअभावी, महागडे उपचार करायला थांबले आहात का ? चला तर मग ! सांगवी येथील अटल महाआरोग्य शिबिराला सर्व वैद्यकीय उपचार मोफत…! भेट देऊया…! लाभ घेऊया …!

निरोगी आरोग्यासाठी • रोगाच्या निदानापासून रोग निवारणापर्यंत !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २१ डिसेंबर) :  महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २४ आणि २५ डिसेंबर असे दोन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीर होणार आहे. या शिबीरासाठी ऑनलाइन नाव नोंदणीला सुरूवात झाली असून, गरजू रुग्णांना क्यूआर कोड, वेबसाइट तसेच मोबाईलवर फोन करूनही आपली नाव नोंदणी करता येणार आहे.

या शिबीरात सर्व आजारांच्या तपासण्या, मार्गदर्शन, उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. शिबीरात मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नामांकित रुग्णालये सहभागी होणार आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी करणार असून, शस्त्रक्रियाही मोफत केली जाणार आहे.

येथे करा ऑनलाइन नाव नोंदणी :-

शिबीरासाठी रुग्णांना https://healthcamp.site या वेबसाईटवर ऑनलाइन नाव नोंदणी करता येईल. याशिवाय नाव नोंदणीसाठी 7507411111 किंवा 7575981111 या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे शिबीर केवळ तपासणी करण्याकरीताचे शिबीर नसून रुग्णाला बरा होईपर्यंत उपचार करण्यात येणार असल्याचे शिबीराचे आयोजक तसेच भाजपचे चिंचवडे विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले. या शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या आजारांची होणार तपासणी आणि उपचार :-

हृदय रोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण – किडणी विकार व प्रत्यारोपण , लीव्हर प्रत्यारोपण, गुड्ये प्रत्यारोपण हाडांचे व मणक्यांचे बजार हिप प्रत्यारोपण, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग व शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक उपचार , त्वचा विकार , फाटलेली टाळु व ओठांवरील शस्त्रक्रिया, मोफत बॉडी चेकअप,  फिट येणे उपचार मार्गदर्शन, कान-नाक-घसा, अनियमित रक्तदाब आणि शुगर तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी तसेच सर्व आजारांवर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यावर मोफत उपचार व शसक्रिया लहान मुलांच्या हृदयावरील उपचार मोफत अंन्जोग्राफी, अपंगांना जयपुर फुट व कैलीपर्स चे मोफत वाटप तसेच मोफत डोळे तपासणी चष्मे वाटप केले जाणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago