Google Ad
Editor Choice

Kolhapur : शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व … अन् कोल्हापूर १०० सेकंदासाठी स्तब्ध झालं !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : आज शुक्रवारी सकाळी ठीक १०.०० वाजता जिथं आहे तिथं १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला कोल्हापूरकरांनी अनोखी मानवंदना देऊन राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्याचं स्मरण केलं.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्‍नलवर एस.टी. बसेस, अन्य वाहने, जाग्यावर थांबवण्यात आली. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी आणि नागरिकांनी उपक्रमात सहभागी होवून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.

Google Ad

शाहू समाधी स्थळ येथे विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, एन.सी.सी.चे विद्यार्थी, नागरिक यांनी स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन केले. श्री शाहू महाराज की जय ..! जयघोषाने समाधी स्थळ परिसर दुमदुमला.

रेल्वे स्टेशन वरुन दसरा चौक मार्गे कसबा बावडा फुटबॉल क्लबचे खेळाडू आणि कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे कलाकार ज्योत घेऊन आले. शाहू मिल येथून बिंदु चौक, लक्ष्मीपुरी दसरा चौक मार्गे संयुक्त राजारामपुरीचे कार्यकर्ते ज्योत घेऊन आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या उत्साहाने शाहू प्रेमी कार्यकर्ते शाहू ज्योती घेऊन आले होते. शाहूवाडी येथून 45 किलोमीटर चे अंतर धावत ही शाहू ज्योत समाधी स्थळी आणण्यात आली. कोल्हापूर शहरातील पाण्याचा खजिना येथून आणलेली शाहू ज्योत मिरजकर तिकटी, केशवराव भोसले नाट्यगृह, बिंदू चौक, शिवाजी पुतळा मार्गे समाधीस्थळी आली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके आणि कोल्हापूर शहरातून पाच अशा एकूण 17 शाहू ज्योत शाहू समाधीस्थळी आणण्यात आल्या. प्रारंभी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू ज्योतीचे स्वागत केले.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह कृतज्ञता पर्व समिती सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या अनोख्या उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले.

कार्यक्रमाचे संयोजन कृती समिती सदस्य उदय गायकवाड, इंद्रजित सावंत, प्राचार्य डॉ.महादेव नरके, प्रमोद पाटील , आदित्य बेडेकर, ऋषिकेश केसकर, प्राचार्य अजेय दळवी, अमरजा निंबाळकर,जयदीप मोरे, सुखदेव गिरी, प्रसन्ना मालेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील, विभागांतील मान्यवरांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!