Google Ad
Editor Choice

Shirur : खैरेनगर विविध विकास सोसायटी निवडणूक २०२२ … जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जून) : शिरूर तालुक्यातील खैरेनगर विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. खैरेनगर ची सन २०२२ ते २०२७ सोसायटीच्या व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणुक अगदी चुरशीत पार पडली . निवडणूक प्रक्रियेमध्ये ०६ जून ला झालेल्या मतदानासाठी ११ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात होते.

खैरेनगर विविध विकास सोसायटी निवडणूक २०२२ जय हनुमान शेतकरी विकास पॅनल व हनुमान पाचपिर बाबा विकास पॅनल यांच्यातील लढत शिरूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. खैरेनगर विकास सोसायटीची मागील पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध झाली होती, या नवीन निवडून आलेल्या संचालक मंडळात कोणीही सोसायटीचा सभासद न्हवते आणि ग्रामपंचायत मध्येही सभासद न्हवते, त्यामुळेच गावाने ठरवून नवीन उद्यमुख नागरिकांना संधी देण्यात आली आणि त्या  संचालक मंडळास भरगोस असे यशही मिळाले.

Google Ad

चांगल्या संचालकांची निवड होणे गरजेचे आहे, अशी परिस्थिती तयार झाल्याने निवडणूक चुरशीची होणार हे नक्की होते यात जय हनुमान शेतकरी विकास पॅनलच्या १२ ही उमेदवारांनी बाजी मारत विजयश्री खेचून आणला.

आज झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलचे श्री . खैरे ज्ञानेश्वर रखमाजी सौ . खैरे मंदा कारभारी श्री . खैरे तात्याबा नाना श्री . खैरे नामदेव तुकाराम सौ . खैरे सुंदर एकनाथ श्री . खैरे पाटीलबुवा दगडू , श्री . खैरे रामदास दगडू श्री . खैरे शिवाजी ज्ञानोबा श्री . खैरे शांताराम पाटीलबुवा, श्री . शिंदे तुकाराम शंकर, श्री . सातपुते श्रीकांत नारायण हे उमेदवार विजयी झाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!