Google Ad
Editor Choice

सामाजिक बांधिलकी जपत, सांगवी येथे ‘डोनेट एड’ सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ऑगस्ट) : कोरोनाच्या संकटकाळात होत असणारा रक्ताचा तुटवडा आणि ते मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ पहाता, आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली डोनेट एड सोसायटी अध्यक्ष सारिका कृष्णा भंडलकर यांनी बुद्धघोष बुद्ध विहार, बुद्ध घोष सोसायटी याठिकाणी ब्लड कनेक्ट फाऊंडेशन आणि शिवामृत सहयोग समूह यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शहीद वीर पत्नी मंगलताई साळुंके यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन सतीश कांबळे, संतोष ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे तसेच कृष्णकांत चांडक, तृप्तीताई कांबळे, भाजपा युवती अध्यक्ष सोनम गोसावी, संजय मराठे, प्रीती श्रीवास्तव, सौरभ डोलारे, पीएसआय ब्लड बँक चे डॉ. अरुण पाटील, मारुती मोहिते, शरद जांभूळकर, रणदिवे, प्रताप भोसले, स्मिताताई आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

गौतम बुद्धांची शिकवण आहे की, शिक्षण हे फक्त अर्थार्जन करण्याचे साधन नसून ते व्यक्तीच्या दु:खाचा अंत करणारे एक क्रांतिकारी शस्त्र आहे हे युवकामध्ये रूढ होण्याची गरज आहे. एक धर्म म्हणून नव्हे तर एक जीवन जगण्याची पद्धत म्हणून बुद्धांच्या विचारसरणीच्या आधारे आपले आचरण करण्याची नितांत गरज आहे. बुद्धांनी दिलेल्या मूल्यांची व विचारसरणीची वैज्ञानिक दृष्टिकोनातून समज करून आजच्या तरुण पिढीने सम्यक मार्ग आत्मसात करणे गरजेचे आहे.

त्यांच्या या शिकवणीतूनच आपण रक्तदान करून आपली दान पारमिता या पवित्र दिनी वाढवू या असा संकल्प या वेळी सारिका आणि कृष्णा भंडलकर केला.

डोनेट एड सोसायटीने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले .या कार्यक्रमात भाजपा प्रभाग अध्यक्ष कृष्णा भंडलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!