Categories: Uncategorized

महायुतीचे अधिकृत उमेदवार ‘शंकर जगताप’ यांच्या प्रचारार्थ काळेवाडी येथील पदयात्रेत नागरिकांच्या उपस्थितीने ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीचा उच्चांक मोडला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ नोव्हेंबर २०२४ –  चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप -शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ काळेवाडी येथील पदयात्रेत नागरिकांच्या उपस्थितीने  ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीचा उच्चांक मोडला. काळेवाडी परिसरात मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहून विजयाची माळ जगताप यांच्याच गळ्यात पडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारानिमित्त काळेवाडी येथे पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या पदयात्रेत राष्ट्रवादीचे नेते हनुमंत गावडे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेवक विनोद नढे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक संतोष कोकणे, माजी नगरसेविका निता पाडाळे, माजी नगरसेविका ललिता पाटील, माजी नगरसेवक सुरेश नढे पाटील, माजी नगरसेविका उषा काळे, माजी नगरसेविका विमल काळे,  माजी स्विकृत सदस्य विनोद तापकीर, काळूराम नढे, देविदास पाटील, बाबासाहेब जगताप, संगिता कोकणे, धर्मा पवार, भरत ठाकूर, राहुल झाडखंडे, प्रविण अहिरे, प्रशांत डाखवे, प्रतिभा ताम्हणकर, रवि खिलारे, रमेश काळे, दिलीप काळे, कल्पना काकुळदे, सोमनाथ तापकीर, विलास पाडाळे, सचिन बाबाजी काळे, मधुकर काळे, राहुल झाडखंडे, किरण पन्हाळे, प्रकाश लोहार, सचिन काळे, भरत ठाकूर, अमोल भोसले, विजय सुतार, नवनाथ नढे, आकाश भारती, हर्षद नढे, रवि दाभोळे, रुपेश तापकीर, प्रमोद येवले, विकास साठे, अश्विनी कांबळे, दिपक पंचबुध्ये, निलेश तापकीर, विशाल वाळके, प्रकाश लोहार, सागर चौधरी, सचिन काळे, कयुन शेख, बबलू शेख, भैय्यासाहेब कांबळे, भरत दोषी, राजाभाऊ शिंदे, शामराव नढे, वाकचौरे मामा, बजरंग नढे, अतुल नढे, स्वप्निल नढे, महेश शिंदे, अनिल शिरसागर, पृथ्वीराज नढे, युवराज नढे, प्रवीण मोहिते, योगेश लोहार यांच्यासह महायुती मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळेवाडी गावठाण येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला. त्यानंतर ज्योतिबा नगर, १०० खोली, पंचनाथ कॉलनी, उंदर्या गणपती चौक, क्रांतिवीर कॉलनी, ओंकार कॉलनी, स्त्री हॉस्पिटल, गणेश कॉलनी, कारवार चौक, अलफोन्सा स्कुल रोड, हॉटेल आठवण चौक, आदर्श चौक, बीआरटी रोड, ज्योतिबा उद्यान, पवना नगर या भागात झंझावाती दौरा झाला. यावेळी जागोजागी महिलांनी जगताप यांचे औक्षण केले. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात नागरिकांना अभिवादन करत ‘कमळ’ चिन्हाला मतदान करत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शंकर जगताप यांच्यासारख्या विकासाची दूरदृष्टी असणारा, माणुसकी जपणारा, करारी तरीही संवेदनशील असलेल्या शंकर जगताप यांच्याकडेच चिंचवडचे नेतृत्व सोपविणार, असा ठाम निश्चय काळेवाडीकरांनी बोलून दाखविला.

स्व. लक्ष्मणभाऊ आणि अश्विनीताई यांच्या आमदारनिधीतून काळेवाडीत उद्यान असेल, पिंपरी पूल ते काळेवाडी गावठाण रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण असेल, पिण्याच्या पाण्याची मोठी पाईपलाईन असेल, प्रथमोपचार केंद्र अशी काही विकासकामे करण्यात आली आहेत. तर काही विकासकामे प्रलंबित अवस्थेत आहेत. या विकासकामांना गती देण्यासाठी मी सर्वात प्रथम प्राधान्य देणार असून पुढील दोन वर्षात काळेवाडी गावाचा विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलून ‘काळेवाडीला विकासाचा आयकॉन बनविणार’, अशी ग्वाही मी सर्व काळेवाडीकरांना देतो.

– शंकर जगताप

Maharashtra14 News

Recent Posts

कबुतरे महत्त्वाची, रहिवासी नाहीत का ?? नागरिकांनी केला मोठा प्रश्न तर, पुण्यातही वाद पेटला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…

7 mins ago

देवांग कोष्टी समाजातील मागील दीड वर्षापासून चा वाद संपुष्टात

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…

7 hours ago

हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ता रुंदीकरणावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला … अजित दादा काय म्हणाले?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…

2 days ago

राखीच्या धाग्याने विणला ‘बहीण भावाच्या’ नात्याचा विश्वास’! पिंपळे गुरव येथे सौ पल्लवी जगताप यांच्या कडून अंध अनाथ कल्याण केंद्रात अनोखा रक्षाबंधन सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…

2 days ago

आमदार ‘शंकर जगताप’ यांनी आयोजित केलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात ७५३ तक्रारींचे निराकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…

3 days ago

पिंपळे गुरव येथील ‘ब्रिलियंट स्टार प्री स्कूल’ मध्ये एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम उत्साहात साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…

3 days ago