Google Ad
Editor Choice

✒️पत्रकार “गोविंद वाकडे” यांची अखेर सुटका; मराठी पत्रकार परिषदेच्या प्रयत्नांना आलं यश

Journalist “Govind Wakde” finally died;  Kudos to the efforts of the Marathi Journalist Council

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .११ डिसेंबर) : पुणे जजिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर शाईफेक करणारयांना तर अटक झालीच त्याच बरोबर या घटनेचं वार्तांकन करणारया पत्रकार गोविंद वाकडे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.. हा सरळ सरळ पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होता.. याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र भर उमटली. मराठी पत्रकार परिषदेने या विषयाच्या अनुषंगाने तातडीची बैठक घेऊन उद्या राज्यभर आंदोलन करण्याचे ठरविले होते.. विविध पत्रकार संघटनांच्या ऑनलाईन बैठकीत अटकेचा निषेध करून उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला गेला होता, मात्र ती वेळ आली नाही. त्या अगोदरच गोविंद वाकडे यांची सुटका करण्यात आली.

पत्रकार संघटनांचा आक्रमक पवित्रा आणि पत्रकाराच्या संतप्त भावना विचारात घेऊन सरकारला माघार घेत गोविंद वाकडे यांची रात्री उशीरा सुटका करावी लागली. पत्रकार संघटना आणि राज्यातील पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबददल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस.एम देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Google Ad

चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरणामध्ये स्थानिक पत्रकार गोविंद वाकडे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यांच्यावर कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे आधीपासून होते अशी माहिती पोलीसांना मिळाली होती.

काल चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इचगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!