महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जुलै) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील अत्यंत कार्यक्षम अधिकारी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यांच्या जागी सोलापूर महानगर पालिकेतील उपायुक्त विजय खोराटे या अभ्यासू अधिकाऱ्याची वर्णी लागली आहे
राज्यातील सत्तेत झालेल्या बदलाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांना पहिला झटका बसला आहे. त्यांची राज्य शासनाने मुदतपूर्व बदली केली असून त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्तपदी विजयकुमार खोराटे यांची वर्णी लागली आहे. राज्याच्या सत्ता समीकरणात झालेल्या बदलाचे हे पडसाद असल्याची चर्चा सुरू झाली असून जितेंद्र वाघ यांची बदली त्याचं अनुषंगाने असल्याचं बोललं जातय.
पिंपरी चिंचवड महापालिकेवर सद्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त पदी असलेले वाघ हे अत्यंत कार्यकुशल आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांचा कार्यकाल संपन्या आधीच आज संध्याकाळी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आलंय, विशेष म्हणजे जितेंद्र वाघ यांना त्यांची सेवा त्यांच्या मूळ महसूल व वन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी – छापवाले यांच्या स्वाक्षरीने वाघ यांची बदली करण्यात आली .
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…