Google Ad
Uncategorized

जयभीमचा जयघोष, थोर महामानवास अभिवादन करण्यासाठी पिंपरी मध्ये जमलेला अथांग जनसागर आणि पुतळ्यावर हेलिकॅप्टरमधून पुष्पवृष्टी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१४ एप्रिल २०२३ :- पिंपरी येथील भीमसृष्टीचा सजलेला परिसर, जयभीमचा जयघोष, थोर महामानवास अभिवादन करण्यासाठी जमलेला अथांग जनसागर आणि पुतळ्यावर हेलिकॅप्टरमधून होत असलेली पुष्पवृष्टी अशा अनोख्या संगमाने आज सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात सुरुवात झाली.

       पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तसेच पिंपरी चौक आणि एच.ए.कॉलनी येथील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासन शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Google Ad

       यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, उप आयुक्त रविकिरण घोडके, मनोज लोणकर, माजी नगरसदस्य ॲड.सचिन भोसले, अनंत को-हाळे,मारुती भापकर, सद्गुरू कदम, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, उप अभियंता ल्क्ष्मीकांत कोल्हे, चंद्रकांत कुंभार, एच.ए.कंपनी येथील रमेश जाधव, सुरेंद्र  पासलकर, मारूती बोरावके, मिलींद जाधव, सुनिल रिकामे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक आदी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!
WhatsApp Group