Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संगीत अकादमीच्या संयुक्त विदयमाने … जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठात भक्तिरस भक्तिमय वातावरणात संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२डिसेंबर) : चिखली पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड ज्युनियर कॉलेज टाळगांव चिखली या ठिकाणी कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका संगीत अकादमीच्या संयुक्त विदयमाने भक्तिरस हा कार्यक्रम आयोजित केला गेला .

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा . आयुक्त श्री राजेश पाटील तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजाचे अकरावे वंशज ह.भ.प पुंडलिक महाराज देहुकर जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान देहु व विश्वस्त प्रमुख ह.भ.प विशाल महाराज मोरे , जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्था पावनधाम बीड संस्थापक श्री महंत ह.भ.प महादेव महाराज बोराड शास्त्री , दिंडीचे अध्यक्ष काळुराम मोरे प्रमुख पाहुणे म्हणुन तसेच संतपीठाचे संचालक श्री . ह.भ. प राजु महाराज ढोरे व संचालिका स्वाती मुळे व संतपीठाचे अभ्यासक श्री . प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे उपस्थित होते .

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा . आयुक्त श्री राजेश पाटील साहेब व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन , सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली . अंतरराष्ट्रीय दर्जाच्या संतपीठाच्या उभारणीमध्ये संत महंतांनी कायमस्वरूपी मार्गदर्शन करावे पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असावा असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे आयुक्त श्री राजेश पाटील यांनी व्यक्त केले .

तसेच सी.बी.एस.सी शिक्षणाबरोबर मराठी साहित्य व संस्कृतीचे एक अगळेवेगळे शिक्षण देण्यासाठी संतपीठाची निर्मिती टाळगांव चिखली या काणी होत आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक सौ . उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाच्या सादरीकरणामध्ये संतपीठाचे संचालक श्री राजु महाराज ढोरे श्रीरामाचा 13 अक्षरी मंत्र तसेच रूप पाहता लोचणी या अभंगरचनाने सुरूवात केली . त्यानंतर मूर्ती पुजन , मान्यवरांचे सत्कार व कार्यक्रमास सुरुवात झाली . त्याचबरोबर गायत्रीताई थोरबोले यांनी संदर ते ध्यान , विठ्ठल रखुमाई हे अभंग सादर स्नेहल पगार यांनी ओव्या गाऊनी सुरात हे गीत सादर केले .

नेहा नाफडे यांनी कानडा राजा पंढरीचा व आळंदी हे गाव हे अभंग सादर केले . वैजयंती भालेराव यांनी खेळमांडीयेला वाळवंटी घाई व दिंडी चालली चालली हे अभंग सादर केले . स्मिता देशमुख यांनी सर्व सुखची लहरी हा अभंग सादरकेला . नंदीन सरीन यांनी ओम नमो ज्ञानेश्वरा व सावळे मनोहर रूप अति देखणे हे अभंग सादर केले . सुष्मा शिंदे यांनी आनंदाचे डांही आनंद तरंग व अरे अरे ज्ञाना झालासी पावन हे अभंग सादर केले गायत्रीताई थोरबोले यांनी एकच टाळी झाली हा अभंग व गीरीधर का रूसला ही गौळण सादर केली . राजु महाराज ढोरे यांनी अकल्प आयुष्य तया हा अभंग व गडयानो राधा की रे झाला ही गौळण सादर केली . दलाल सर यांनी रंग आणा हो रंगनी व मिळे आवडीचे सुख हे अभंग सादर केले .

त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी तबला साथ विनोद सुतार , संतोष साळवी व समीर सुर्यवंशी , मृदंग साथ तुकाराम ढोरे , करताल साथ हरिभाऊ असदकर , हार्मोनियम साथ दलाल सर , उमेशजी पुरोहित , नेहा नाफडे यांनी दिली . कार्यक्रमाचे आयोजन जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे सर्व संचालक आयोजक , शिक्षक , शिक्षकेतर इतर कर्मचारी यांनी केले . कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन संतपीठाच्या संचालिका सौ . स्वाती मुळे यांनी केली तर कार्यक्रमाचे प्रास्तविक संतपीठाचे संचालक ह.भ.प राजु महाराज ढोरे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतपीठाचे अभ्यासक श्री प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे यांनी केले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!