J.K. : भाजपच्या ‘या’ नेत्याची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्र 14 न्यूज : जम्मू-काश्मीर मधील त्राल या गावांमध्ये आतंकवाद्यांनी राकेश पंडित नावाच्या एका भाजप नेत्याची गोळ्या मारून हत्या करण्यात आली आहे. भाजप नेते राकेश पंडीत यांना सरकारच्या वतीने दोन पीएसओच्या माध्यमातून संरक्षण देण्यात आलेलं होतं, तरी ही ते आपल्या रक्षकांच्या शिवाय त्राल या ठिकाणी, आपल्या एका मित्राला भेटायला गेले होते. याचाच अतिरेक्यांनी फायदा उठवला आहे. तेथे त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

सदर घटना बुधवारी रात्री घडल्याची माहिती मिळाली आहे. ज्या वेळी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर अतिरेक्यानी बेछूट गोळीबार केला आहे. या दुर्घटनेनंतर लगेच त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु इलाज चालू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी अतिरेक्यांना पकडण्यासाठी जोरदार मोहीम राबवली आहे.

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल, मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे की, त्राल मध्ये राकेश पंडित यांच्यावर झालेल्या गोळीबाराची माहिती ऐकून दुःख झाले आहे. मी या घटनेचा जाहीर निषेध करत आहे. त्यांनी सांगितले की, अतिरेक्यांचा नापाक हेतू कधी ही सफल होणार नाही. पंडित राकेश यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण इलाक्याची नाका-बंदी केलेली आहे. सुरक्षारक्षकांनी अतिरेक्यांना पकडण्यासाठी कडक मोहीम राबवली आहे. अजून तरी सदर मोहिमेचा हा वृत्तांत समोर आलेला नाही.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

2 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago