Google Ad
Editor Choice

महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही, लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या गौतमी पाटीलवर अनेक स्थरातून टिकेची झोड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ नोव्हेंबर) : गौतमी पाटील हे प्रकरण महाराष्ट्रात चांगलंच गाजत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या गौतमी पाटीलवर अनेक स्थरातून टिकेची झोड उठली आहे.गौतमीच्या त्या अश्लील डान्सची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

अनेक पक्षांनी आणि लावणी सम्राज्ञींनी गौतमीवर टीका केली आहे. अशातच आता मनसे पक्षानं गौतमीवर निशाणा साधला आहे. गौतमी पाटील प्रकरणावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

Google Ad

गौतमीच्या डान्सला आवर घाला अन्यथा गृहमंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फोडू असा थेट इशारा देण्यात आला आहे. मनसे विद्यार्थी सेनेकडून ही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. विद्यार्थी सेनेकडून पोलीस महासंचालकांकडे पत्र लिहून तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सवर मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्व काकडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

जालन्यातील सेवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकामार्फत पोलीस महासंचालकांडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटलंय, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अनेक कलाकार आपली संस्कृती जपत कला सादर करतात. मात्र गौतमी पाटील हेतू पुरस्पर अश्लील हावभाव करत आहे.

‘नाहीतर महिला स्टेजवर जाऊन मारतील’; ‘तो’ डान्स पाहून संतापल्या सुरेखा पुणेकर त्यांनी पुढे म्हटलंय, गौतमी पाटील अश्लील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून अश्लील अंगप्रदर्शन करत आहे. यामुळे महाराष्ट्रात अश्लीलतचं वातावरण निर्माण होत आहे. याचे वाईट परिणाम महाराष्ट्रातील तरूणांवर होत आहेत. त्यामुळे गौतमी पाटील विरोधात कठोर कारवाई करा.

तिच्यामुळे महाराष्ट्रातील गुणी कलाकारांच्या नावाला कलंक लागू नये ही विनंती. तसंच त्यांनी पुढे म्हटलंय, आमच्या मागणीवर कारवाई न केल्यास आम्ही गृहमंत्रालयाच्या काचा फोडू, असा इशारा दिला आहे. बिग बॉस मराठीमधून बाहेर आलेली अभिनेत्री मेघा घाडगे हिनं सोशल मीडियावर गौतमी पाटीलला लावणी क्विन म्हटल्यानंतर संताप व्यक्त केला होता. तसंच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनाही गौतमीवर टीका केली. अशा कलाकारांना समाजात स्थान देऊ नका नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!