Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

अडचणीच्या काळात शासनाच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी … राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिंचवड विधानसभा अध्यक्ष ‘शाम जगताप’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८मे) : कोरोनाच्या विरोधात लढा देतांना आर्थिक साहाय्य करणार्‍यांसाठी राज्यशासनाकडून ‘कोविड १९ मुख्यमंत्री साहाय्यता निधी’ स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्राणघात ठरत आहे. राज्य शासन आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या साथीने या संकटावर मात करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.

अडचणीच्या काळात शासनाच्या पाठीशी उभे राहणे ही आपलीही जबाबदारी आहे, आणि या जबाबदारीची जाणीव ठेवून पिंपळे गुरव येथील युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष ‘शाम जगताप’ यांनी आपला वाढदिवस साजरा न करता आपल्या राज्यावर आणि शहरावर आलेल्या संकटास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयाचा धनादेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केला.

Google Ad

यावेळी बोलताना ‘शाम जगताप’ म्हणाले, कुशल संयमित कारकीर्दीत गेल्या वर्षी आलेली पहिली लाट रोखण्यास राज्य शासनाला यश आले. या आपत्तीच्या निवारणार्थ राज्य सरकार आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या साथीने या संकटावर मात करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. या त्यांच्या प्रयत्नास हातभार लावणे हे एक सेवक म्हणून आपलेही कर्तव्य आहे. आपण दरवर्षी आपला वाढदिवस साजरा करतो परंतु आपल्या या छोट्याशा मदतीने एखाद्याचे प्राण वाचले तर यासारखी अविस्मरणीय आठवण माझ्या आयुष्यात दुसरी असूच शकत नाही. आणि ही आठवणच मला पुढे प्रेरणा देत राहील.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील ,माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक नाना काटे, विद्यमान नगरसेवक मयूर कलाटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रशांत देवकाते, उपाध्यक्ष तानाजी ऊर्फ पिंटू जवळकर, अमर आदीयाल, अक्षय जगताप, संकेत विधाते, अभीषेक काशीद, अमित जगताप ,उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

49 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!