Google Ad
Editor Choice

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे गरजेचे….. मा.पोपटराव भसे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.15 नोव्हेंबर) :- अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे आज काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करणे यातूनच उद्याचे कलाकार घडत असतात आणि त्याची सुरुवात अशा स्पर्धांमधून होत असे मत प्रतिथ यश लेखक व संस्थेचे उपाध्यक्ष मा. पोपटराव भसे यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, शिशुविहार, नूतन माध्यमिक विद्यालय सांगवी आयोजित बाल दिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये व्यक्त केले.

तसेच त्यांच्या हस्ते शिक्षक पालक स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भसे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, पंडित नेहरू, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, शेतकरी ,भाजीवाल्या, भारतीय जवान, तुकाराम, ज्ञानेश्वर, डॉक्टर ,वकील, योग गुरु ,इंदिरा गांधी इत्यादी वेशभूषा करून सादरीकरण केले. अतिशय सुंदर अशा वेशभूषेतून समाज प्रबोधन , जनजागृती, स्वच्छतेचा, मानवतेचा ,एकतेचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

Google Ad

एकूण 250 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. आबासाहेब जंगले, सचिव तुळशीराम नवले, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सौ. सुनीता टेकवडी, सीमा पाटील, हेमलता नवले ,मनीषा लाड, स्वप्नील कदम ,शितल शितोळे , दिपाली झणझणे, श्रद्धा जाधव ,भाग्यश्री रापटे, गायत्री कोकाटे ,संध्या पुरोहित, पंचशीला वाघमारे, संगीता सूर्यवंशी, नीता ढमाले, निर्मला भोईटे, कुसुम ढमाले, मनीषा गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी केले. तर निवेदन व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!