Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

आदर्शवत : च-होली मधील ‘लाँग आईसलँड’ सोसायटीमध्ये सोसायटीच्या कोविड रुग्णांसाठी आयसोलेश वॉर्ड सुरू … !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : चऱ्होली येथील ‘प्राईड वर्ल्ड सिटी’ मधील लॉंग आईसलँड सोसायटीमध्ये त्या सोसायटीमधील जे सदस्य कोरोनाने बाधित होतील व ज्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे असतील त्यांना उपचार करण्यासाठी सोसायटीच्या क्लबहाऊसमधेच सोय करण्यासाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. याचे उदघाटन आज भोसरी विधानसभेचे आमदार तथा भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले,

यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर नितीन काळजे, चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, सोसायटीचे चेअरमन अतुलसिंग राठोड, सोसायटीचे सेक्रेटरी कृष्णा त्रिपाठी तसेच शासकीय पुनःनियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्य सचिव दिपक पाटील या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर अजित साठे व सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

Google Ad

या लाँग आईसलँड सोसायटीमध्ये सद्या 10 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे , त्यातील 2 बेड ऑक्सिजन युक्त असणार आहेत व इतर 6 बेड हे साधे बेड असणार आहेत, सोसायटीमधील ह्या आयोसोलेशन वॉर्ड मध्ये ऍडमिट होणाऱ्या रुग्णावर उपचार व देखभाल डॉ.अजित साठे करणार आहेत.

सोसायटीमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये खेळती हवा, टॉयलेट बाथरूम, तसेच फॅन एसी व इतर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सद्याच्या कोरोनाच्या वाढत्या महामारीत सोसायटीने हे चालू केलेले आयसोलेशन सेंटर सोसायटीधारकांसाठी खूप महत्वाचा मदतरुपी आधार ठरणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!