Categories: Editor Choice

सिमेंटच्या जंगलात शेतातील ज्वारीचे पीक जोमात बहरले … जगताप कुटूंबीय ठरले पशु पक्षांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जानेवारी) : आधुनिक काळात काहीही घडू शकते, याचा प्रत्येय पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील शिवदत्त नगर दिसून येत आहे. परिसरात कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली असून थंडी आणि धुके असे वातावरण सध्या ज्वारीसाठी फार अनुकूल ठरत आहे. दोन तीन महिन्यांपूर्वी पेरणी करण्यात आली होती. परिसरात कडाक्याची थंडी पडण्यास सुरवात झाली असल्याने थंडी आणि रात्रभर पडणारे धुके खास करुन ज्वारीसाठी चांगलेच फायदेशीर ठरत आहे. पिंपळे गुरव मधील शेतकरी कुटुंबातील पोपट जगताप यांनी आपल्या पाच एकर शेतात ज्वारीची पेरणी केली आहे. शेतीला आधुनकतेची जोड देत सेंद्रिय खताला प्राधान्य देऊन पेरणी केलेले ज्वारीचे पीक सध्या जोमात बहरले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे शेतातील बहरलेली ज्वारीची पिके लक्ष वेधून घेत आहेत.

भोवताली गगनचुंबी इमारतींचे वाढते जाळे, जमिनीला आलेला सोन्याचा भाव असे असतानाही येथील सिमेंटच्या जंगलात शेती अजूनही शिल्लक आहे. वर्षभर पारंपरिक पद्धतीने याठिकाणी जगताप कुटुंबियांकडून आजही शेती केली जात आहे. सध्या शहरात इतरत्र शेती पहायला मिळत नाही. मात्र जगताप कुटुंबीय सांगत आहेत. केवळ पशु पक्षांना पोटभर खाण्यासाठी ही शेती जोपासली जात आहे. त्यामुळे येथील हजारो चिमणी पाखरे अन्न पाण्यासाठी आलेली पहावयास मिळत आहेत. याचा सर्वाधिक आनंद पोपट जगताप, महेश जगताप, हरिभाऊ जगताप यांच्या कुटुंबीयांना मिळत असल्याचे सांगत आहेत. जणूकाही या चिमण्या पाखरांना त्यांनी आवाहनच केले आहे … पक्षांनाही भावना असतात भाषा कळते, ते आवाहनाला नक्किच साद देतील, हे काही वेगळे सांगायला नको.

शहरात जसजसे शहरीकरण मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. तसतशी शहरातील शेत जमीन संपुष्टात येऊ लागली आहे. सध्या या सिमेंटच्या जंगलात काही मोजकीच शेतकरी शेती करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र जगताप कुटुंबीय हे एक आगळा वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेऊन पशु पक्षां बद्दल असलेले प्रेम पहावयास मिळत आहेत. सायंकाळच्या सुमारास येत शेतात पशु पक्षी किलबिलाट करत मनमुरादपणे आनंद घेत असल्याचे पहावयास मिळत आहे. नागरिकही येथील दृश्य पाहून येथील जगताप कुटुंबीयांचे कौतुक करीत आहेत.

पर्यावरण नेहमीची मनुष्याच्या अनेक गरजा पूर्ण करत आला आहे . आपल्या जीवनामध्ये पशुपक्षी वृक्षांचे खूप महत्वाचे स्थान आहे .

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे । आळविती ।। येणे सुख रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष । अंगी येत ।।

संत तुकाराम महाराज यांनी अशा सुंदर शब्दात निसर्गाशी नाते सांगितले आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago