Categories: Uncategorized

भारतातील पहिल्या केथकीपुरम कैथाप्रम रिसॉर्ट व AI थीम पार्कसाठीच्या इन्व्हेस्टर्स समिटला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : AI तंत्रज्ञान, नैसर्गिक सौंदर्यानेयुक्त केथकीपुरम कैथाप्रम रिसॉर्ट व मिरॅकल पार्कचा संगम असलेल्या भारतातील  पहिल्या AI थीम पार्कसाठीच्या इन्व्हेस्टर्स समिटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर, मनोरंजन उद्योग, नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. 

पिंपळे गुरव, पुणे येथे या संदर्भात इन्व्हेस्टर समिटचे आयोजन करण्यात आले होते. या समिटचे उदघाट्न पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संशोधक डॉ. राजेशकुमार गांझु, सामाजिक कार्यकर्ते विशाल मिठे, भाजपा शहर उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर, माजी स्विकृत नगरसेवक संजय कणसे, भाजपा शहर सरचिटणीस धर्मेंद्र क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई जवळकर, उद्योजक रघुनाथ जवळकर आदी उपस्थित होते.

प्रशांत शितोळे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले, की रोबोटीक तंत्रज्ञानाचा प्राधान्याने वापर करण्यात येत असलेले भारतातील पहिले केथकीपुरम कैथाप्रम रिसॉर्ट व मिरॅकल पार्क उभारण्याची कल्पनाच पर्यटन क्षेत्रात नवा आयाम आणत आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूकदार या संकल्पनेचा नक्की स्वीकार करतील.

केथकीपुरम कैथाप्रम रिसॉर्टचे चेअरमन प्रसाद पंडित यावेळी बोलताना म्हणाले, की केरळमध्ये  पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रोजगार निर्मिती करण्याच्या आणि स्थानिक व्यवसायांना पाठिंबा देऊन आर्थिक वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने केथकीपुरम कैथाप्रम रिसॉर्ट व मिरॅकल पार्क उभारणी करण्याचा उद्देश आहे. यामध्ये पर्यावरणाचा संगम असणार आहे. त्यासाठी नैसर्गिक धबधबे आणि स्थानिक परिसंस्थांचे रक्षण करून पर्यावरणाचे रक्षण करण्याला प्राधान्य राहील. भारताचा सांस्कृतिक वारसा जपत आणि नैसर्गिक सौंदर्य राखत हा प्रकल्प उभा केला जात आहे.
***********************

AI सिस्टीमचा प्रभावी वापर : AI सिस्टीमचा वापर करीत रोबोटला हाताळण्याला यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. जेवण बनविणे, ते सर्व्ह करण्यासोबतच सेवेचा वेग आणि गुणवत्ता सुधारणे, ग्राहकांचे वेटिंग कमी करणे करीत  उद्यानाची एकूण कार्यक्षमता वाढवणे हे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

रोबोटिक इनडोअर पार्क पर्यटकांचे आकर्षण म्हणून डिझाइन केले जाऊ शकते, ज्यामध्ये प्रदर्शन, रोबोट शो आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी इतर आकर्षणे आहेत. रिअल टाइम माहिती, प्रश्नांची उत्तरे आणि पर्यटकांना मदत करण्यासाठी AI महत्त्वची जबाबदारी पार पाडेल. तसेच पर्यटकांच्या खाण्याच्या आवडी-निवडी, डायट्स आणि ऍलर्जींवरील डेटा गोळा करू शकते. ही माहिती नंतर प्रत्येक अतिथीला अनुकूल मेनू तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
**********************
रिसॉर्ट व मिरॅकल पार्कचे फायदे:
– प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील, स्थानिक आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
– हे रहिवासी आणि पर्यटक दोघांसाठी मनोरंजन आणि शैक्षणिक केंद्र म्हणून काम करेल.
– शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे, या क्षेत्रातील भविष्यातील प्रकल्पांसाठी एक मॉडेल सेट करेल.
– प्रकल्प नैसर्गिक धबधब्यांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी समर्पित आहे.
– जैवविविधता संवर्धनावर भर.
– प्रकल्प सर्व संबंधित स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय कायदे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करेल.

Maharashtra14 News

Recent Posts

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन …. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन  - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…

2 days ago

एकाच तिकीटावर मुंबईकरांना सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरता येणार’

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…

4 days ago

महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट…* *आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज मोरे यांचा सन्मान..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…

2 weeks ago

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने … पिंपळे गुरव परिसरात २० हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…

3 weeks ago

स्वच्छतेमुळेच पेशंट बरे होण्यास मदत होते – नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…

3 weeks ago