Categories: Editor Choice

कर्नाटक बिदर येथे ‘जागतिक मानवाधिकार दिन’ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या वतीने साजरा … महाराष्ट्रातील टीमचाही सहभाग!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .१० डिसेंबर) : समाजातील प्रत्येक व्यक्तीला जन्मताच काही हक्क प्राप्त झालेले असतात. प्रत्येकजण हा जन्मतः स्वतंत्र असतो. याशिवाय वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, दारिद्रय, जन्मस्थान इतर आधारांवर कोणाशीही भेदभाव होणार नाही, यासाठी विशिष्ट कायदे देखील अस्तित्वात आहेत.

समता, स्वातंत्र्य, शिक्षणाविषयाचे हक्क प्रत्येकासाठी आहेत. मानवाधिकांराविषयी समाजात जागृकता पसरावी, यासाठी संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी १० डिसेंबरला मानवी हक्क दिन साजरा केला जातो.

आज (दि.१० डिसेंबर) कर्नाटक बिदर येथे ‘जागतिक मानवाधिकार दिन’ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या वतीने श्री हौशिला प्रसाद दुबे – राष्ट्रीय प्रधान महासचिव, कुलदीप सिंह राष्ट्रीय ट्रेझरर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी मोहम्मद मिसबा अहमद अध्यक्ष-दक्षिण भारत, डॉ. शब्बीर बेग (कार्याध्यक्ष- महाराष्ट्र) , दादासो दराडे- अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, डॉ .देविदास शेलार – अध्यक्ष पुणे जिल्हा, ऍड. अस्विनी बोगम-प्रभारी, सुषमा भालेकर महिला उपाध्यक्ष पुणे जिल्हा, शेख रशीद (उपाध्यक्ष महाराष्ट्र), अर्षद खान (मराठवाडा सेक्रेटरी) तसेच विविध राज्यातील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्यारक्तदान शिबिराचे आयोजन देखिल करण्यात आले होते.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष हौशिला प्रसाद दुबे – राष्ट्रीय प्रधान महासचिव म्हणाले, मानवाधिकार समितीचे मुख्य कार्य हे मानवाच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करणे हे असते. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबत तक्रार दाखल करून चौकशी करणे व कारवाई करणे हे समितीचे प्रमुख कार्य आहे. बालविवाह, बालकामगार, कामगारांचे हक्क याकडे देखील मानवाधिकार लक्ष देते. स्त्रिया, कैदी यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी यासाठी देखील ihrjpc सरकारला सूचना देऊ शकते. थोडक्यात, मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये यासाठी समितीकडून वेळोवेळी पावले उचलली जातात.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago