Google Ad
Editor Choice Education Technology

व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानातील अभिनवता या विषयावरील आतंरराष्ट्रीय परिषदेचे दिनांक २५ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजन

महाराष्ट्र १४ न्युज, (दिनांक २३ फेब्रुवारी २०२२) : ‘व्यवस्थापन शास्त्र व माहिती तंत्रज्ञानातील अभिनवता’या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषेदेचे आयोजन यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने करण्यात  आले आहे.

इंडो युरोपियन एज्युकेशन फौंडेशन,पोलंड व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या संस्थांच्या सहकार्यानेया परिषदेचे  आयोजन करण्यात  आले आहे.कोविड १९  संकटाच्या   पार्श्वभूमीवर  ही परिषद  ऑनलाईन पद्धतीने होणार असून  दिनांक २५ व २६ फेब्रुवारी असे दोन दिवस चालणाऱ्या  या परिषदेत भूतान येथील गेडू  कॉलेज ऑफ बिझनेसचे प्रा. फुब दोरजी व सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठाच्या  वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर हे प्रमुख  पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करणार आहेत.

Google Ad

परिषदेच्या पहिल्या दिवशी इंडो युरोपियन एज्युकेशन फौंडेशन,पोलंडचे अध्यक्ष डॉ.प्रदीप कुमार,ब्लेझकान मलेशियाचे संचालक कौशिक मोहनराज यांची मार्गदर्शन सत्रे आयोजित केली आहेत. तर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी

बुल्गारियाच्या वर्णा वाणिज्य विद्यापीठाचे प्रा. सिल्व्हेना योर्दानोव्हा, इन्फोसिस  कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गजानन शिंदे,पोलंडच्या अप्लाईड सायन्स विद्यापीठाचे प्रा.डॉ.मारियुसझ कोलोसॉव्हस्की, मलेशियन  ग्रॅज्युएट  स्कुल ऑफ  एंट्रीप्रेन्युअरशिप  एन्ड  बिझनेस  युनिव्हर्सिटीच्या  अधिष्ठाता प्रा. डॉ. रोझलीन  अहमद  सौफी यांची मार्गदर्शन सत्रे होणार असून या आंतरराष्ट्रीय  परिषदेचा  समारोप भारत फोर्ज लि. कंपनीच्या  मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध  विभागाचे संचालक डॉ. संतोष  भावे  यांच्या मार्गदर्शन  सत्राने होणार  आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी भारतासह भूतान, पोलंड, मलेशिया, बुल्गारिया आदी देशातून  आलेले निवडक शोधनिबंध  सादर करण्यात  येणार  आहे अशी माहिती यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे  यांनी दिली.

अधिक माहितीसाठी  संपर्क 

योगेश  रांगणेकर 

मोबा : 7350014536 / 9325509870

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!